वनस्पतींचे अवशेष म्हणजेच पालापाचोळा, जनावरांचा उरलेला चारा, घरातील ओला कचरा तसेच भाजीपाला इत्यादींना जिवाणू आणि बुरशीच्या साह्याने कुजवले जाते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत ( Compost Manure / Fertilizer ) असे म्हणतात.
कंपोस्ट खत हे ग्रामीण भागात निर्माण झालेल्या सेंद्रिय पदार्थांपासून सूक्ष्म जिवाणूंच्या साह्याने तयार केलेले अत्यंत उत्तम प्रकारचे खत असते. कंपोस्ट खत तयार करण्याच्या निरनिरळ्या पद्धती आहेत. यामध्ये इंदोर पद्धत, बेंगलोर पद्धत, सुपर कंपोस्ट खत, नॅपेड पद्धत इत्यादी पद्धतींचा समावेश होतो.
जंगलातील झाडांची पाने, काटक्या जमिनीवर पडतात, वारा व वादळाने झाडे मोडून जमिनीवर पडतात, शाकाहारी प्राणी वनस्पती खातात आणि त्यांच्या विष्ठेतून सेंद्रिय पदार्थ बाहेर पडतात. जेव्हा मासांहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खातात तेव्हा त्यांच्या विष्ठेत सेंद्रिय पदार्थ असतात. शेतीतील पिकांचे अवशेष जमिनीत मिळतात. मेलेल्या मुळया जमिनीत कुजतात.
तुम्ही गोमूत्र ( Cow Urine ) या विषयीची माहिती गोमूत्र ( Cow Urine ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

गुरे, शेळया-मेंढया, रानात चरतात तेंव्हा त्यांचे शेण व लेंड्या जमिनीवर पडतात. शेणकिडे (भुंगे) शेणाचे गोळे करून आपल्या बिळात नेतात व शेण खातात जमिनीत राहणारे कीटक, लहान प्राणी व जिवाणू मरतात, तेंव्हा त्यांचे शरीरातील सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळतात. अशाप्रकारे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजविण्याच्या विविध अवस्था असतात. कच्चे सेंद्रिय पदार्थ माणसाला ओळखता येतात, पण ते पूर्णपणे कुजल्यानंतर त्याचा मूळचा आकार राहत नाही. तेंव्हा त्याला ह्युमस असे म्हणतात.
कंपोस्ट खत देण्याची पद्धत ( Manure Method of Composting ):

कंपोस्ट खत हे दरवर्षी प्रती हेक्टर 7.5 ते 12.5 टन पेरणीच्या 15 दिवस आधी पसरवले जाते. जर या प्रकारच्या कंपोस्ट खताची उपलब्धता कमी असेल तर पेरणीच्या वेळी नरसाळ्यांमधून हे खत देतात.खत देण्याचे चाडे (नरसाळे) पुढे ठेवून बियाणे पेरणीकरिता चाडे मागे असते. त्यामुळे प्रथम खत जमिनीत पडते व त्यानंतर बियांची पेरणी होते. टाक्यांमधून खत काढल्यावर ते मोकळ्या जागेत ठेवत नाहीत. तर ते काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास त्याचा ढीग घालून त्यावर गवताच्या सहाय्याने झाकण घालून ठेवावे. अधून मधून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे खतामध्ये आर्द्रता कायम राहण्यास मदत मिळते.
कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती ( Methods of Making Compost ):

1) इंदोर पद्धत ( Indore Method ):
- याच पद्धतीला ढीग पद्धत असे म्हणतात.या पद्धतीमध्ये सर्वसाधारणपणे 6 फूट रुंद व 5 ते 6 फूट उंच आणि सेंद्रिय पदार्थांच्या उपलब्धतेनुसार लांबी ठेवून शेतातील उरलेले पिकांचे अवशेष, काडीकचरा, शेण, तण इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा त्यावर एक थर ठेवला जातो.
- ढेक पद्धतीने कुजण्याची जी प्रक्रिया असते ती उघड्यावर चांगल्या प्रकारे होते. त्यासाठी किमान महिन्याभराच्या कालावधीनंतर ढीग वर खाली करावा लागतो. जेणेकरून खत पूर्णपणे एकजीव होते आणि त्यामध्ये ऑक्सिजन मिसळला जातो.
- त्याच बरोबर खतामध्ये आर्द्रता टिकून राहावी यासाठी पाणी शिंपडावे. तसेच ढिगावर प्लास्टिकचे किंवा गवताचे झाकण टाकावे जेणेकरून आतील तापमान वाढून खताचे कुजण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते. सुमारे तीन ते चार महिन्यांनी उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.
- या खतामध्ये 0.8 ते 1.5 टक्के नत्र, 0.5 ते 1 टक्के स्फुरद आणि 1 ते 1.8 टक्के पालाश मिळते त्याचबरोबर इतरही अन्न घटकांचा समावेश असतो.
2) नॅपेड पद्धत ( Napped Method ):
नेपेड पद्धत ही पुसद येथील कै. नारायण देवराव पांढरीपांडे या शेतकऱ्याने त्यांच्या प्रयोगातून विकसित केले आहे.
- या पद्धतीमध्ये जमिनीवरती पक्क्याबीटांच्या साह्याने 10 फूट लांब, 6 फूट रुंद व 3 फूट उंच अशा प्रकारच्या टाकीचे बांधकाम केले जाते. आणि विटांच्या दोन ओळीनंतर तिसऱ्या ओळींमध्ये खिडक्या ठेवल्या जातात.
- सुमारे एक ते दीड टन इतका काडीकचरा त्याचबरोबर 100 किलोग्रॅम शेण, दीड टन चाललेली बारीक माती यामध्ये भरली जाते.
- नॅपेड पद्धतीमध्ये सर्वांत खालचा थर चांगला ठोकून शेणाचा सडा टाकून घेतात.
- त्यानंतर 6 इंच जाडीचा काडीकचरा थर व इतर सेंद्रिय पदार्थांचा थर देऊन त्यावर 100 लिटर पाण्यात 4 ते 5 कि. ग्रॅ. शेण मिसळून शिंपडले जाते.
- शेवटी साधारणता 1 ते 2 इंच इतक्या जाडीचा चाळलेल्या मातीचा थर देऊन पुन्हा पाणी शिंपडून थोडेसे ओले केले जाते. अशाप्रकारे सुमारे 3 ते 4 महिन्यांच्या कालावधीनंतर उत्तम प्रकारचे कंपोस्ट खत तयार होते.
3) बंगलोर पद्धत ( Bangalore Method ):
- बेंगलोर पद्धतीलाच खड्डा पद्धत म्हणून ही ओळखतात. या पद्धतीमध्ये सर्वात शेवटचा म्हणजेच खालचा जो थर असतो त्यामध्ये 15 ते 20 सेंटीमीटर इतक्या जाडीचा गाडीकचरा आणि बाकीचे सेंद्रिय पदार्थांचा वापर करून तयार केला जातो. नंतर त्यावरती पाणी शिंपडून हा थर ओला केला जातो.
- अशा प्रकारे खड्डा भरून जमिनीच्या सुमारे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत आल्यावर त्याला चारही बाजूने शेण मातीचे मिश्रण करून लिंबून घेतले जाते.
- सेंद्रिय खताची खोजण्याची प्रक्रिया लवकर आणि उत्तम होण्याकरिता उष्ण वातावरण असणे गरजेचे असते त्याचबरोबर त्यामध्ये ओलावाही टिकून राहावा यासाठी अधून मधून त्यावरती पाणी शिंपडावे.
- सुरुवातीला कुजण्याची जी प्रक्रिया सुरू होते ती ऑक्सिजन विरहित असते त्यामुळे सुरुवातीचा कुजण्याचा वेग हा सावकाश असतो. त्यामुळे खत तयार होण्यास वेळ लागतो.
एक टन कंपोस्ट खतापासून मिळणारे अन्नद्रव्य किलोग्राम प्रमाणे ( Nutrient Yield from 1 Ton of Compost in kilograms ):
अ. क्र. ( Sr. No. ) | अन्नद्रव्यांचे नाव ( Name of Nutrients ) | वनस्पती ( शेकडा प्रमाण ) Plants ( Percentage ) |
1 | नत्र | 5.6 किलो. |
2 | स्फुरद | 3.5 किलो. |
3 | पालाश | 7.8 किलो. |
4 | गंधक | 1 किलो. |
5 | मंगल | 200 ग्रॅम. |
6 | जस्त | 96 ग्रॅम. |
7 | लोह | 80 ग्रॅम. |
8 | तांबे | 15.6 ग्रॅम. |
9 | बोरॉन | 20 ग्रॅम. |
10 | मॉलिब्डेनम | 2.3 ग्रॅम. |
11 | कोबाल्ट | 1 ग्रॅम. |
12 | कर्ब | 45 |
13 | प्राणवायू | 45 |
14 | उदजन | 6 |
15 | कॅल्शियम | 0.5 |
16 | मॅग्नेशियम | 0.2 |
कंपोस्ट खताचे फायदे ( Benefits of Compost Manure ):

- कंपोस्ट खतांचा वापर केल्याने जमिनीमधील उपयुक्त असे सूक्ष्म जीवाणूंच्या नत्र स्थिरीकरण करण्याच्या प्रक्रियेत व त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
- जमिनीमधील पाणी टिकवून ठेवण्याचे क्षमता वाढते.
- जमिनीची धूप कमी होण्यामध्ये मदत मिळते.
- पिकांसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा काही अंशी पुरवठा होतो.
- जमिनीमधील सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन क्षमतेमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होते.
कंपोस्ट खताचा पिकनिहाय वापर ( Crop wise use of Compost ):
अ. क्र. ( Sr. No. ) | पिकांचे नाव ( Name of Crops ) | प्रति हेक्टरी कंपोस्ट खत ( Compost per Hectare ) |
1 | भुईमूग | 10 टन |
2 | सोयाबीन | 25 ते 30 टन |
3 | सूर्यफूल | 2.5 टन |
4 | ऊस | 50 टन |
5 | बाजरी | 5 टन |
6 | खरीप ज्वारी | 10-12 टन |
7 | गहू | 20 टन |
8 | मका | 10-12 टन |
9 | हळद | 25 – 40 टन |
10 | चारा पिके – ( ज्वारी, बाजरी, मका, चवळी, ओट बर्शीम मका ) | 10-15 टन |
11 | लसुन घास | 20-30 टन |
12 | आंबा, डाळिंब | 50 किलो प्रति झाड |
13 | केळी, शेवगा | 10 किलो प्रति झाड |
14 | चिकू | 100 किलो प्रति झाड |
15 | पेरू | 10 किलो प्रति झाड |
16 | नारळ, जांभूळ, चिंचा, कागदी लिंबू | 10-15 किलो प्रति झाड |
17 | मोसंबी | 15-20 किलो प्रति झाड |
18 | टोमॅटो, वांगी | 20 टन |
19 | कांदा, भेंडी | 40 टन |
20 | कारले, वाल, काकडे | 20 टन |
21 | लसूण, मिरची | 20-35 टन |
22 | दोडका, टरबूज, दुधी भोपळा, खरबूज | 15-20 टन |
23 | फुलकोबी, कोबी, घेवडा, बटाटा | 40-50 टन |
24 | मेथी, पालक | 10-12 टन |
25 | वाटाणा | 25-30 टन |
26 | मुळा | 50 टन |
27 | गुलाब, कारनेशन, जरबेरा | 5-10 किलो प्रति झाड |
28 | निशिगंध | 40-50 टन |
29 | ग्लॅडीओलस | 60-100 टन |
निष्कर्ष / Conclusion
वनस्पतींचे अवशेष म्हणजेच पालापाचोळा, जनावरांचा उरलेला चारा, घरातील ओला कचरा तसेच भाजीपाला इत्यादींना जिवाणू आणि बुरशीच्या साह्याने कुजवले जाते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जे खत तयार होते त्याला “कंपोस्ट खत” ( Compost Manure / Fertilizer ) असे म्हणतात.
FAQs
1. कंपोस्ट खत म्हणजे काय ? ( What is Compost ? )
वनस्पतींचे अवशेष म्हणजेच पालापाचोळा, जनावरांचा उरलेला चारा, घरातील ओला कचरा तसेच भाजीपाला इत्यादींना जिवाणू आणि बुरशीच्या साह्याने कुजवले जाते आणि ही प्रक्रिया झाल्यानंतर जे खत तयार होते त्याला कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) असे म्हणतात.
2. कंपोस्ट खत देण्याची पद्धत कोणती ? ( What is the Method of giving Compost ? )
कंपोस्ट खत हे दरवर्षी प्रती हेक्टर 7.5 ते 12.5 टन पेरणीच्या 15 दिवस आधी पसरवले जाते. जर या प्रकारच्या कंपोस्ट खताची उपलब्धता कमी असेल तर पेरणीच्या वेळी नरसाळ्यांमधून हे खत देतात.खत देण्याचे चाडे (नरसाळे) पुढे ठेवून बियाणे पेरणीकरिता चाडे मागे असते. त्यामुळे प्रथम खत जमिनीत पडते व त्यानंतर बियांची पेरणी होते. टाक्यांमधून खत काढल्यावर ते मोकळ्या जागेत ठेवत नाहीत. तर ते काही दिवस साठवून ठेवायचे असल्यास त्याचा ढीग घालून त्यावर गवताच्या सहाय्याने झाकण घालून ठेवावे. अधून मधून त्यावर पाणी शिंपडावे. त्यामुळे खतामध्ये आर्द्रता कायम राहण्यास मदत मिळते.
3. कंपोस्ट तयार करण्याच्या पद्धती किती आणि कोणत्या आहेत ? ( How much and what are the Methods of making Compost ? )
कंपोस्ट तयार करण्याच्या तीन पद्धती आहेत.
बंगलोर पद्धत ( Bangalore method )
नॅपेड पद्धत ( Napped method )
इंदोर पद्धत ( Indore method )
4. कंपोस्ट खतापासून कोणकोणती अन्नद्रव्य मिळतात ? ( What Nutrients are available from Compost Manure? )
कंपोस्ट खतापासून कर्ब, प्राणवायू, उदजन, नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, लोह, मॅग्नीज, बोरॉन, जस्त, तांबे, मोलीब्लेनम, क्लोरीन इत्यादी अन्नद्रव्य मिळतात.
5. कंपोस्ट खताचे फायदे कोणते ? ( What are the Benefits of Compost ? )
1. कंपोस्ट खतांचा वापर केल्याने जमिनीमधील उपयुक्त असे सूक्ष्म जीवाणूंच्या नत्र स्थिरीकरण करण्याच्या प्रक्रियेत व त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते.
2. जमिनीमधील पाणी टिकवून ठेवण्याचे क्षमता वाढते.
3. जमिनीची धूप कमी होण्यामध्ये मदत मिळते.
4. पिकांसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा काही अंशी पुरवठा होतो.
6. कंपोस्ट खताचा वापर कोणकोणत्या पिकांसाठी केला जातो ? ( For which Crops is Compost Manure Used ? )
कंपोस्ट खताचा वापर भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, ऊस, बाजरी, खरीप ज्वारी, गहू, मका, हळद, चारा पिके – ( ज्वारी, बाजरी, मका, चवळी, ओट बर्शीम मका ), लसुन घास, आंबा, डाळिंब, केळी, शेवगा, चिकू, पेरू, नारळ, जांभूळ, चिंचा, कागदी लिंबू, मोसंबी, टोमॅटो, वांगी, कांदा, भेंडी, कारले, वाल, काकडे, लसूण, मिरची, दोडका, टरबूज, दुधी भोपळा, खरबूज, फुलकोबी, कोबी, घेवडा, बटाटा, मेथी, पालक, वाटाणा, मुळा, गुलाब, कारनेशन, जरबेरा, निशिगंध, ग्लॅडीओलस यांसारख्या अनेक पिकांसाठी केला जातो.
आजच्या या कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून
Related Topics
- ओल्या जमिनीची शेती ( Wet Land Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming
- सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?
- माशांचे खत ( Fish Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers