सेंद्रिय शेती ( Organic Agriculture ) हा शेती आणि अन्न उत्पादनाचा एक दृष्टीकोन आहे जो पिकांचे उत्पादन आणि पशुधन वाढवण्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत पद्धतींचा वापर करण्यावर भर देतो. सेंद्रिय शेती Organic Farming – ज्याचा उद्देश पर्यावरण, वनस्पती, प्राणी आणि मानव यांच्यात सुसंवादी संतुलन निर्माण करणे हा आहे.
भारत हा कृषिप्रधान ( Agriculture ) देश आहे. भारतात विविध भागांमध्ये तेथील जमीन, हवामान यांवर आधारित वेगवेगळी शेती केली जाते. त्यानुसार पिकांचे विविध प्रकार पाहायला मिळतात.
उदा: ( पूर्व भारत ) आसाम, मणिपूर, नागालँड चहाचे उत्पन्न घेतले जाते. तर जम्मू-काश्मीर मध्ये केसरचे उत्पन्न घेतले जाते. पंजाब मध्ये गहू तर केरळ, तामिळनाडू सारख्या समुद्र किनारपट्टी असलेल्या भागांमध्ये नारळ, सुपारी, काजू , तांदळाचे पिक पिकवले जाते. महाराष्ट्रात बाजरी , ज्वारी सारखे उत्पन्न घेतले जाते.
हरितक्रांतीच्या अगोदर शेतामध्ये केवळ शेणखत वापरत असत. सेंद्रिय शेती Organic Farming / Agriculture म्हणजे परंपरागत आलेली शेती पद्धती होय. शेती करताना रासायनिक खते आणि औषधांचा वापर न करता फक्त शेतातील पिकांचे काढणीनंतरचे अवशेष, गोमूत्र , शेण व नैसर्गिक साधनांचा वापर करून केली जाणारी शेती पद्धती आहे.
तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming ) यांतील फरक सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming या लेखात जाणून घेऊ शकता.

सेंद्रिय शेती म्हणजे काय What is Organic Agriculture / Farming ?
सेंद्रिय शेती Organic Farming म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. या शेती पद्धतीमध्ये निसर्गाशी सुसंगतपणे काम केले जाते. सेंद्रिय शेती पद्धतीचे भरपूर फायदे आहेत त्या फायद्यांची माहिती सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? ( Advantages & Disadvantages Organic Farming ? ) या लेखामध्ये घेणार आहोत. सेंद्रिय शेतीसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे सेंद्रिय खते वापरली गेली पाहिजेत.
नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. शरीराला अपायकारक रासायनिक औषधींचा सहजपणे व अति प्रमाणात वापर होत आहे. हा होत असलेला वापर पाहता सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने तयार केले अन्नधान्य, फळे, आणि भाज्या यांची मागणी वाढत आहे.
पूर्वीपासून सेंद्रिय पद्धतीने शेती केली जायची. परंतु कालांतराने वाढती लोकसंख्या व त्यामुळे रासायनिक खतांचे प्रमाण वाढले गेले. त्यानुसार दिवसेंदिवस पर्यावरणाचे प्रदूषण वाढले. आणि त्यामुळे रोगांचेही प्रमाण वाढले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून ( Agriculture Department ) कृषी विभाग ने सेंद्रिय शेती करण्यास प्राधान्य दिले आहे व त्यानुसार पुढील घटकांचा समावेश केला.
सेंद्रिय शेतीच्या मुख्य तत्त्वांमध्ये पुढील घटक समाविष्ट होतात
सिंथेटिक रसायने ( Synthetic Chemicals ) टाळणे:
सेंद्रिय शेतकरी कृत्रिम खते, कीटकनाशके, तणनाशके आणि जनुकीय सुधारित जीव (GMOs) वापरणे टाळतात. त्याऐवजी, ते कीटक आणि रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नैसर्गिक पद्धती वापरतात, जसे की पीक फिरवणे, फायदेशीर कीटक आणि सेंद्रिय कंपोस्ट.
मातीचे आरोग्य ( Soil Health ):
सेंद्रिय शेती जमिनीचे आरोग्य राखण्यासाठी आणि वाढविण्यावर जोरदार भर देते. यामध्ये जमिनीची सुपीकता आणि रचना सुधारण्यासाठी कंपोस्टखत आणि हिरवळीचे खत वापरणे समाविष्ट आहे. निरोगी माती रोपांच्या वाढीस चांगली मदत करते आणि पाणी टिकवून ठेवण्यास मदत करते, धूप होण्याचा धोका कमी करते.
जैवविविधता ( Biodiversity ):
सेंद्रिय शेती अनेकदा वनस्पती आणि प्राण्यांसाठी वैविध्यपूर्ण अधिवास निर्माण करून जैवविविधतेला प्रोत्साहन देतात. वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींच्या विस्तृत श्रेणीला प्रोत्साहन देऊन, सेंद्रिय शेतकरी एक अधिक लवचिक परिसंस्था तयार करतात जी कीटक आणि रोगांना चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकते.
प्राणी कल्याण ( Animal Welfare ):
सेंद्रिय पशुधन शेतीमध्ये, प्राण्यांना घराबाहेर प्रवेश दिला जातो आणि त्यांच्या कल्याणाला प्राधान्य दिले जाते. त्यांचे संगोपन अशा पद्धतीने केले जाते जे त्यांना त्यांचे नैसर्गिक वर्तन व्यक्त करण्यास अनुमती देते आणि वाढ संप्रेरक आणि प्रतिजैविकांचा वापर कमी केला जातो.
शाश्वतता ( Sustainability ):
सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत असणे, जैवविविधता ( Ecosystem ) शेती पद्धतींचा नकारात्मक प्रभाव कमी करणे आहे. संसाधनांचे संरक्षण करणे, पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण करणे आणि उर्जेचा वापर कमी करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
निष्कर्ष / Conclusion
सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , रासायनिक औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.
FAQs
1. सेंद्रिय शेती म्हणजे काय? What is an Organic Farming / Agriculture?
सेंद्रिय शेती, ज्याला पर्यावरणीय शेती किंवा जैविक शेती म्हणूनही ओळखले जाते, ही एक कृषी प्रणाली आहे जी शेती सेंद्रिय उत्पत्तीची म्हणजे खतांचा वापर करते, जसे की कंपोस्ट खत, जैविक खत.
2. सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? Advantages & Disadvantages Organic Farming ?
फायदे-
1) सेंद्रिय शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते.
2) आरोग्यास पोषक असण्याऱ्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाची निर्मिती होण्यास मदत होते.
तोटे-
1) सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. या नैसर्गिक स्त्रोतांची मर्यादित उपलब्धता असते. त्यामुळे यांना विकत घेण्यासाठी जास्त खर्च लागू शकतो.
2) सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादन कमी होते.
3. भारतातील शेतीचे मुख्य प्रकार कोणते आहेत ? What are the main types of Farming in India ?
भारतातील शेतीचे मुख्य 5 प्रकार आहेत.
1) मिश्र शेती ( Mixed Farming )
2) वृक्षारोपण ( Plantation )
3) निर्वाह शेती ( Subsistence Farming )
4) कोरडवाहू / ओल्या जमिनीची शेती ( Dry Land & Wet Land Farming )
5) सघन आणि विस्तृत शेती ( Intensive & Extensive farming )
4. सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे ? Important of Organic Farming ?
सुपीकता, मातीची रचना आणि जैवविविधता राखणे आणि सुधारणे आणि जमिनीची धूप कमी करणे यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे.
5. ऍग्रीकल्चर / फार्मिंग म्हणजे काय ? Agriculture / Farming meaning in Marathi ?
ऍग्रीकल्चर / फार्मिंग म्हणजे शेती होय.
6. हिंदीमध्ये ऍग्रीकल्चर / फार्मिंग म्हणजे काय ? Agriculture / Farming meaning in Hindi ?
ऍग्रीकल्चर / फार्मिंग मतलब खेती आहे.
आजच्या या सेंद्रिय शेती Organic Agriculture / Farming in Marathi लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics
- गांडूळ खत ( Vermicompost ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- मिश्र शेती ( Mixed Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming