नैसर्गिक संसाधनांचा वापर करून औषध, खते तयार करणे व पारंपारिक बियाणाचा वापर करून केलेली विषमुक्त रासायनिक खते , औषधे यांचा वापर टाळून करण्यात आलेली शेती म्हणजे सेंद्रिय शेती होय.
सेंद्रिय शेती काळाची गरज बनत आहे. शरीराला अपायकारक रासायनिक औषधींचा सहजपणे व अति प्रमाणात वापर होत आहे. हा होत असलेला वापर पाहता सेंद्रिय शेती व सेंद्रिय पद्धतीने तयार केले अन्नधान्य, फळे, आणि भाज्या यांची मागणी वाढत आहे.
तुम्ही सघन शेती ( Intensive Farming ) या विषयीची माहिती सघन शेती ( Intensive Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming या लेखात जाणून घेऊ शकता.

सेंद्रिय शेती कोणत्या तत्वावर आधारित आहे?
पर्यावरणीय तत्त्व
सेंद्रिय शेती ही निसर्गाच्या जीवनचक्रावर अवलंबून असायला हवी. जेणेकरून जीवसृष्टीला धरून चालणारी हवी. या प्रकारच्या शेतीमुळे कोणत्याही पराकारचे प्रदूषण होत नाही.
आरोग्यायचे तत्त्व
पशू, पक्षी, माती, हवा, वनस्पती, मनुष्यप्राणी व निसर्गचक्र यांचे आरोग्य वाढविणे हा सेंद्रिय शेतीचा ( Organic Farming ) प्रामुख्याने उपयोग आहे. सेंद्रिय शेतीचा अवलंब केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होऊन मानवाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
संगोपनाचे तत्त्व
सर्व घटकांचे संगोपन सुयोग्यरीत्या होण्यास मदत होते. जेणेकरून, सध्याच्या आणि पुढच्या पिढीतील सर्वांचे आरोग्य योग्य रितीने राखले जाण्यास मदत होईल.
सेंद्रिय आणि रासायनिक शेतीचे फायदे-तोटे कोणते ?Advantages & Disadvantages

सेंद्रिय शेती Organic Farming
Advantages of Organic Farming ( सेंद्रिय शेती )
1) सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मातीची धूप कमी होते, जलप्रदूषण होत नाही तसेच शेतीला फायदेशीर असणारे कीटक आणि वन्यजीवांचे नुकसान कमी होते.
2) सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात.
3) सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. त्यामुळे मानवाचे आरोग्य जोपासले जाते. शिवाय जमिनीची धूप कमी होते.
सेंद्रिय शेती मुळे जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहते त्यामुळे हवामान बदल कमी करण्यासाठी मदत मिळते. सेंद्रिय मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते.
4) सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट उच्च गुणवत्तेचे अन्न तयार करणे हे आहे. त्यामुळे उत्पादनांना नैसर्गिक चव असते व पौष्टिक मूल्य आणि उत्पादनांची गुणवत्ता चांगली असते.
Disadvantages of Organic Farming ( सेंद्रिय शेती )
1) सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन कमी झाल्यास उत्पादनांची किंमत वाढू शकतात आणि अन्नाची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सेंद्रिय शेतीसमोर एक आव्हान उभे राहू शकते. जमिनीची धूप होऊन मातीची गुणवत्ता खालावते.
2) सेंद्रिय शेती नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून असते जसे, कंपोस्ट खत. या नैसर्गिक खतांमध्ये पिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊ शकते.
3) सेंद्रिय शेतीमध्ये पीक रोटेशन, जैविक किड नियंत्रण आणि कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो. या सेंद्रिय कीटकनाशकांच्या प्रभाव रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी प्रभावी असू शकतो.
4) सेंद्रिय शेती पद्धतीला रासायनिक शेतीच्या तुलनेत अधिक शारीरिक श्रम करावे लागते. उदाहरणार्थ हाताने गवत (तण) काढणे, पीक फिरवणे आणि कीटकांची निरीक्षण करणे. यामुळे मुजरांचा खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च देखील वाढतो.

रासायनिक शेती Chemical Farming
Advantages of Chemical Farming ( रासायनिक शेती )
1) कृत्रिम / रासायनिक खतांचा वापर करून आवश्यक ती पोषक द्रव्य पिकांना दिल्याने पिकाची जलद वाढ आणि उच्च उत्पादन होते.
2) रासायनिक शेती पद्धतीने पिकाचे वाढीव उत्पन्न मिळू शकते. यामुळे जागतिक अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते.
3) रासायनिक शेतीमध्ये कीटकनाशके आणि तन नाशकांचा वापर करून कीड, रोग आणि तन यांचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करता येते.
4) रासायनिक शेती सेंद्रिय शेतीच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कारण, कृत्रिम खते आणि कीटकनाशके नैसर्गिक खतांच्या तुलनेत स्वस्त असतात.
5) रासायनिक शेतीने कमी शेत जमिनीत अधिक उत्पादन मिळते आणि त्यामुळे शेती अल्पभूधारक शेतकऱ्याला परवडते.
Disadvantages of Chemical Farming ( रासायनिक शेती )
1) रासायनिक शेतीमध्ये कीटक आणि रोग कालांतराने कीटकनाशकाविरुद्ध रोगप्रतिकारशक्ती विकसित करू शकतात. त्यामुळे कालांतराने अधिक शक्तिशाली आणि विषारी कीटकनाशक वापरावे लागते आणि त्यामुळे कीटकनाशकांचा वापर करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
2) रासायनिक शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशके आणि त्यांना नाशिक यांच्या रासायनिक वापरामुळे मानवाचे आरोग्य धोक्यात येते. काही रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने कर्करोग, श्वसनाचे विकार, तसेच मेंदूशी संलग्न आजार होऊ शकतात.
3) रासायनिक शेतीमुळे वायु प्रदूषण होते आणि पर्यावरण दूषित होते.
रासायनिक शेती मध्ये कृत्रिम खते आणि कीटकनाशके यांच्या वर अवलंबून असते. ही कीटकनाशके व खते महाग असतात त्यामुळे रासायनिक शेती करण्यासाठी खर्च देखील जास्त लागतो.
4) रासायनिक खतांचा सतत आणि जास्त वापर केल्यामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते. त्यामुळे मातीची रचना बिघडते, जमिनीची सुपीकता कमी होते, जमिनीत ओलावा टिकून राहण्याची क्षमता कमी होते.
5) रासायनिक शेती मध्ये पिकाची निवड आणि लागवडीची पद्धत याबाबत शिथिल असते. या पद्धतीमध्ये उच्च उत्पादन देणाऱ्या वाणांवर लक्ष केंद्रित केले जाते.
निष्कर्ष / Conclusion
- सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात.
- रासायनिक शेतीमुळे वायु प्रदूषण होते आणि पर्यावरण दूषित होते. रासायनिक शेती पद्धतीने पिकाचे वाढीव उत्पन्न मिळू शकते. यामुळे जागतिक अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मदत होऊ शकते.
FAQs
1. सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? Advantages & Disadvantages Organic Farming ?
फायदे-
1) सेंद्रिय शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते.
2) आरोग्यास पोषक असण्याऱ्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाची निर्मिती होण्यास मदत होते.
तोटे-
1) सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. या नैसर्गिक स्त्रोतांची मर्यादित उपलब्धता असते. त्यामुळे यांना विकत घेण्यासाठी जास्त खर्च लागू शकतो.
2) सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादन कमी होते.
2. ऍग्रीकल्चर / फार्मिंग म्हणजे काय ? Agriculture / Farming meaning in Marathi ?
ऍग्रीकल्चर / फार्मिंग म्हणजे शेती होय.
3. सेंद्रिय शेती म्हणजे काय? What is an Organic Farming / Agriculture?
सेंद्रिय शेती, ज्याला पर्यावरणीय शेती किंवा जैविक शेती म्हणूनही ओळखले जाते, ही एक कृषी प्रणाली आहे जी शेती सेंद्रिय उत्पत्तीची म्हणजे खतांचा वापर करते, जसे की कंपोस्ट खत, जैविक खत.
4. रासायनिक शेती म्हणजे काय? What is an Chemical Farming / Agriculture?
कृत्रिम / रासायनिक खतांचा वापर करून केली जाणारी शेती म्हणजे रासायनिक शेती होय.
5. रासायनिक शेतीचे फायदे आणि तोटे ? Advantages & Disadvantages Chemical Farming ?
फायदे–
1) रासायनिक शेती सेंद्रिय शेतीच्या तुलनेत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. कारण, कृत्रिम खते आणि कीटकनाशके नैसर्गिक खतांच्या तुलनेत स्वस्त असतात.
2) कृत्रिम / रासायनिक खतांचा वापर करून आवश्यक ती पोषक द्रव्य पिकांना दिल्याने पिकाची जलद वाढ आणि उच्च उत्पादन होते.
तोटे-
1) रासायनिक कीटकनाशकांच्या वापराने कर्करोग, श्वसनाचे विकार, तसेच मेंदूशी संलग्न आजार होऊ शकतात.
2) रासायनिक खतांचा सतत आणि जास्त वापर केल्यामुळे जमिनीतील पोषक तत्वांचे असंतुलन होऊ शकते. त्यामुळे मातीची रचना बिघडते, जमिनीची सुपीकता कमी होते, जमिनीत ओलावा टिकून राहण्याची क्षमता कमी होते.
आजच्या या सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming in Marathi लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics
- सघन शेती ( Intensive Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming
- शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते / Advantage & Disadvantage of Organic Farming
- गांडूळ खत ( Vermicompost ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers