आजच्या काळात खूप सारे शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. त्यासाठी सेंद्रिय खतांची गरज असते. म्हणून शेतकरी प्रामुख्याने गांडूळ खत प्रकल्प उभारतात. हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखिल केला जातो, रासायनिक खत वापरल्याने आपल्या जमिनीची खुप जास्त प्रमाणात धूप होते. त्यामुळे जमिन नापीक होत चालली आहे, ज्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होते व त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये तोटा देखिल होतो, म्हणून आज आपण गांडूळ खत प्रकल्प व गांडूळ खत निर्मिती कशी केली जाते या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
तुम्ही कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) या विषयीची माहिती कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

गांडूळ खत कसे तयार करावे ? ( How to prepare Vermicompost ? )
शेतकरी प्रामुख्याने गांडूळ खत प्रकल्प उभारतात. हा प्रकल्प उभारण्याचे कारण म्हणजे गांडूळ खतापासून एक घरबसल्या व्यवसाय देखील करता येतो व तसेच त्या गांडूळ खताचा वापर शेतीसाठी देखिल केला जातो, रासायनिक खत वापरल्याने आपल्या जमिनीची खुप जास्त प्रमाणात धूप होते. त्यामुळे जमिन नापीक होत चालली आहे, ज्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता देखील कमी होते व त्यामुळे आपल्याला शेतीमध्ये तोटा देखिल होतो, म्हणून आज आपण गांडूळ खत प्रकल्प व गांडूळ खत निर्मिती कशी केली जाते या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गांडूळ खत प्रकल्प माहिती ( Gandul Khat Kase Tayar Karave ) : Vermicompost
मित्रांनो गांडूळ खत प्रकल्प उभारण्यासाठी आपल्याकडे एक पुरेशी १ ते २ घुन्ठा दमट व हवेशीर जागा असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये आपल्याला एक खाली दाखवलेल्या चित्रासारखा एक पत्र्याचा शेड बांधायचे आहे, शेड हे आपण आपल्या गरजेनुसार बांधणार आहेत, म्हणजेच जर तुम्हाला फक्त तुमच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करायचे असेल तर तुम्ही एक बारीक पत्र्याचे शेड देखिल उभा करू शकत आणि जर तुम्हाला एक व्यवसायाच्या दृष्टीने गांडूळ खत प्रकल्प उभा करायचा असेल तर तुम्ही एक मोठा ३२ बाय १०० चा किंवा १०० बाय ४० चा शेड मारू शकता, जेणेकरून तुम्हाला गांडूळ खताचा साठा हा खुप मोठया प्रमाणात करता येईल. एक महत्त्वाची बाब म्हणजे शेड बांधताना आपण शेड हे दक्षिण-उत्तर दिशेनी बांधावे कारण पूर्व आणि पश्चिम या दिशेने सूर्याचा प्रकाश हा जास्त येत असतो आणि त्याचा त्रास आपल्या गांडूळ खताला न होण्यासाठी आपण हा प्रकल्प दक्षिण-उत्तर या दिशेनी बांधावा तसेच गांडूळ खत व्यवस्थित राहण्यासाठी आपण शेड ला एक हिरव्या रंगाची नेट देखील बांधू शकता जेणेकरून हवा व पाणी आत घुसणार नाही, तसे पाहयला गेल तर गांडूळ खत शेती ही जास्त खर्चिक बाब नाही पण जर तुम्ही एक व्यवसायाच्या दृष्टीने पाहत असाल तर तुम्ही खुप मोठ्या प्रमाणात काम करू शकता आणि चांगला मोबदला मिळवू शकता. गांडूळ खत हे सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण आहे.
गांडूळ खत प्रकल्पासाठी किती खर्च येतो ?

सर्वप्रथम तुम्हाला कच्चा माल लागणार आहे. म्हणजे लेंडीखत, शेणखत, गाडीकचरा, पालापाचोळा असेल जमिनीवर टाकण्यासाठी कीटकनाशकांची पावडर असेल इत्यादी गोष्टींची पूर्वतयारी करावी लागेल. यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एकूण चार हजार रुपये खर्च येणार आहे. जर मजुरीचा खर्च पाहिला तर मजुरी म्हणजे काय आहे की बेड भरणे त्यानंतर तयार झालेला माल त्याठिकाणी काढणे, चाळणी, पॅकिंग करणे असेल त्यानंतर दररोज ४५ दिवस त्या ठिकाणी पाणी मारणे असेल तर नक्कीच याचा खर्च शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन हजार रुपय इतका येईल. जर त्या ठिकाणी गांडूळांचा खर्च पाहिला तर तुम्हाला एका बेडसाठी दीड किलो ( १.५०० Kg )गांड़ूळ लागणार आहेत आणि याचा खर्च तुम्हाला ७५० रुपये इतका येईल आणि तुम्हाला जर HDPE BEDS बेडची किंमत पाहिली तर दोन हजार रुपये प्रतिबेट इतकी आहे. अशाप्रकारे एकूण जर आपण खर्च पाहिला तर एका बेडसाठी तुम्हाला खत तयार करण्यासाठी ८७५० रुपये इतका खर्च येईल.
गांडूळ खत निर्मितीसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
- गांडूळ खत प्रकल्प सावलीमध्ये आणि मध्यम ते दमट ठिकाणी असावा.
- गांडूळ सोडण्याच्या १ दिवस आधी पाणी मारून चांगले ओले करून घ्यावे.
- गांडूळाचे वाफेवर रोज उष्णतेचा अंदाज घेऊन पाणी मारत राहावे.
- शेणखत आणि कचरा पालापाचोळा भाजीपाल्यांचे अवशेष कोंबड्याची विस्टा यांचे प्रमाण 3:1 असावे.
- गांडूळ खताच्या निर्मिती सोबतच वर्मिवाश जमा होतो. तो जमा करण्यासाठी एका बाजूला जागा उपलब्ध करावी किंवा जाळी लावून तयार करण्यात यावी. वर्मीवाश खड्यात जमा होईल अशी सोय करावी.
गांडूळ खत बेड्स

वरील सर्व तयारी झाल्यावर आणि शेड बांधल्यानंतर आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी शेड मध्ये एक चौकोनी आकाराचे उभे बेड्स तयार करावे लागतात, हे बेड्स आपण घरी सुद्धा विटांचे बांधकाम करून तयार करू शकतो, शेतकरी बंधूंनो सध्या जर तुम्ही मार्केटमध्ये पाहिले तर तुम्हाला बारा बाय चार बाय दोन फुट या आकाराचे HDPE BEDS त्या ठिकाणी आलेले दिसून येतील याच्यामध्ये जवळजवळ दीड टना पर्यंत तुमचा कच्चामाल बसतो आणि याच्यामध्ये फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हाला गांडूळ खत तयार झालेले मिळेल, आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने आपण बेड्स तयार करू शकता किंवा विकत घेऊ शकता, खुप सारे शेतकरी दोन्ही पद्धतीच्या बेड्सचा वापर करून गांडूळ शेती करतात आणि जर तुम्ही जरा डोक लावल तर अगदी कमी खर्चात देखिल तुम्ही चांगले बेड्स तयार करू शकता.
गांडुळांच्या संवर्धनासाठी घ्यावयाची काळजी
गांडूळांच्या संवर्धनासाठी आपण कोण कोणती काळजी घ्यावी. साधारणपणे एक चौरस मीटर जागेत दीड ते 2000 गांडुळे असावेत. गांडूळांना प्रामुख्याने मुंग्या उंदीर घूस बेडूक किंवा गोम या शत्रूंपासून वाचवावे. ज्या ठिकाणी गांडूळ ठेवणार आहोत म्हणजेच संवर्धन खोलीत, खोक्यात किंवा वाफ्यातील तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असावे. त्याचबरोबर गादीवाफ्यावर सरळ सरळ सूर्यप्रकाश येऊ नये याचीही काळजी घ्यावी. वाफ्यावर पाणी मारताना जास्त पाणी साचणार नाही याचीही दक्षता घ्यावी. गादीवाफ यातील ओलावा 35 ते 40 टक्के इतका असावा. गांडुळे हाताळताना किंवा खत तयार झाल्यानंतर आपण गांडोळी वेगळे करतो त्यावेळी काही गांडूळांना इजा होते. तर अशा गांडूळांना आपण वेगळे करावे जेणेकरून इतर गांडवांना त्यांचा संसर्गजन्य रोग होणार नाही.
गांडूळ खत निर्मिती कशी केली जाते ? गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती
बेड्स तयार केल्यानंतर आपल्याला गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे जनावरांच शेण लागणार आहे, बहुतेक शेतकरी ही गांडूळ खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या जनावरांच शेण वापरतात पण जर आपल्याला गांडूळ खत कमी दिवसात जास्त प्रमाणात तयार कयायचं असेल तर आपण म्हशीच शेण वापरू शकता आणि म्हशीच शेण हे गांडूळ खतासाठी एक योग्य शेण म्हणून ओळखले जाते, परंतु गांडूळ खतासाठी आपण पूर्णपणे ताज शेण देखिल वापरलं नाही पाहिजे व पुर्णपणे कुजलेल शेण देखिल वापरलं नाही पाहिजे. म्हशीच शेण घेताना कमीत कमी १५ ते २० दिवसाच जुन शेण आपण घेणार आहोत व दोन महिन्याच्या आतील शेण आपण घेणार आहोत, जर आपला गांडूळ खत प्रकल्प हा मोठा असेल तर आपण म्हशीच शेण हे विकत देखिल घेऊ शकता.

शेण घेतल्यानंतर आपल्याला ते शेण बेड्स मध्ये पुर्णपणे पसरवून घ्यायचं आहे आणि पसरवून झाल्यानंतर आपल्याला त्या शेणावर साधारणपणे दोन ते तीन दिवस १०० लिटर इतक पाणी मारायचं आहे व ते शेणखत आपल्याला गार करायचं आहे. सुमारे १५ ते २५ डी. सेल्सियसच्या आसपास आपल्याला त्या शेणाच तापमान (Temperature) ठेवायचं आहे, जास्त गरम ही नाही व जास्त थंड ही नाही अस आपल्यला त्या शेणाच वातावरण ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण त्यामध्ये गांडूळ सोडणार आहोत.
बेड-थरांची माहिती / गांडूळ खत कसे तयार करावे
बेड तयार करताना सर्वप्रथम जमीन व त्यावरती सावकाश कुजणारे सेंद्रिय पदार्थ दोन ते तीन इंच जाडीचा थर ज्यामध्ये नारळाच्या शेंड्या पाचट धसकट थोड्या प्रमाणात शेणखत इत्यादी गोष्टी वापराव्यात नंतर त्यावरती कुजलेल्या शेणखत किंवा गांडूळ खत दोन ते तीन इंच इतक्या जाडीच्या थरामध्ये वापरावे. मग त्यावरती गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर पुन्हा कुजलेले शेणखत किंवा गांडूळ खताचे दोन ते तीन इंच जाडीचा थर द्यावा आणि वरती शेण किंवा पालापाचोळा वगैरे यांचा सुमारे 12 इंच इतका जाडीचा थर द्यावा. सगळ्यात शेवटी बेडमध्ये ओलावा राहण्यासाठी गोणपाटाचा वापर करावा आणि दिवसातून दोन ते तीन वेळा गोणपटावरती पाणी शिंपडावे जेणेकरून बेडमध्ये ओलावा राहतो आणि गांडूळ खत लवकरात लवकर तयार होण्यासाठी याची मदत मिळते.
गांडूळ खतासाठी घ्यावयाची काळजी
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना अशी जमिनी निवडावी ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होतो.
खड्ड्याच्या जवळपास लहान मोठे वृक्ष किंवा झाडे नसावी कारण झाडांचे मुळे गांडूळ खतातील पोषणद्रव्य शोषून घेतात.

गांडूळ खत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असते त्यासाठी शेड किंवा वरती छप्पर असावे जेणेकरून पावसापासून व उन्हापासून बचाव होतो. शेडची उंची थोडी मोठी असावी जेणेकरून वाहतुकीसाठी व आत मध्ये काम करण्यासाठी जागा मोकळी मिळावी आणि शेडच्या बाजूने हिरव्या नेटचा वापर करावा.
गांडूळ खत वेगळे करण्याची पद्धत / गांडूळ खत वेगळे कसे करावे ?
गांडूळ खत तयार झाल्यानंतर गांडुळे व खत वेगळे करण्यासाठी उन्हामध्ये ताडपत्री किंवा गोणपाट अंथरून त्यावर गांडूळ खताचा ढीग करावा. जेणेकरून उन्हामुळे खतातील गांडुळे तळाशी जातात व सहजपणे आपण वरील खत आणि गांडुळे वेगळे करू शकतो. शक्यतो गांडूळ आणि खत वेगळे करताना अवजारांचा वापर करू नये. उदा. कुदळी, टिकाव, फावडे, खुरपे कारण यांच्यामुळे गांडूळांना इजा पोहोचते. फारच गरज भासल्यास हाताने तुम्ही गांडोळे वेगळे करू शकता.
गांडूळ खताचे फायदे | Advantages of Vermicompost

- गांडूळ खतामुळे किंवा गांडूळामुळे जमिनीची पोत सुधारते.
- मातीच्या कणांचा रचनेत उपयुक्त बदल घडविले जातात. ज्यामुळे माती भुसभुशीत होते.
- गांडूळांच्या विष्ठेला “ह्युमस” असे म्हणतात. ज्यामध्ये पिकांच्या वाढीसाठी लागणारे स्फुरद, पालाश व इतर सूक्ष्म द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळतात.
- जमिनीची नैसर्गिक मशागत केली जाते. ज्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते आणि पिकांच्या मुळांना याचा चांगला फायदा होतो.
- जमिनीत पाणी धरून ठेवण्याचे क्षमता वाढते व पाण्याचे बाष्पीभवन फारच कमी प्रमाणात होते.
- जमिनीचा सामू योग्य प्रमाणात राखला जातो.
- गांडूळ खतामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते.
गांडूळ खत किंमत | Gandul Khat Price | Vermicompost Price
गांडूळ खत तयार झाल्यानंतर प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट म्हणजे गांडूळ खतापासून किती किंमत मिळणार. एकंदरीत जर आपण मोजमाप केलं तर दीड टनाच्या गांडूळ खतापासून आपण सुमारे बाराशे किलो इतका गांडूळ खत तयार करू शकतो. गांडूळ खताची विक्री किंमत साधारणपणे प्रति किलो आठ रुपये ते दहा रुपये पर्यंत आहे. सर्वसाधारणपणे तुम्हाला एका बेड पासून किमान दहा हजार ते बारा हजार रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. जर एका बेडचा पूर्ण खर्च वजा केला तर सुमारे 45 दिवसांमध्ये एका बेड मागे तुम्हाला दोन ते अडीच हजार रुपये शिल्लक राहतात. अशाप्रकारे तुम्ही गांडूळ खताचा व्यवसाय करून चांगल्या प्रमाणात फायदा मिळवू शकता आणि स्वतःची आर्थिक स्थिती सुधारू शकता.
निष्कर्ष / Conclusion
गांडूळ हा प्राणी जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळ हा प्राणी जमिनीतील पदार्थ खातो आणि विष्ठा बाहेर सोडून देतो. या त्याच्या विष्ठे पासून आपणास शेतीमध्ये फायदेशीर असलेले गांडूळ खत मिळते.
FAQs
1. गांडूळ खताचे फायदे कोणकोणते आहेत ?
गांडूळ खतामुळे जमिनीची धूप कमी होते, जमिनीमध्ये पाणी टिकून राहते, जमीन सुपीक होते, जमिनीमध्ये असणारे मित्र जिवाणू यांची संख्या वाढते, कचऱ्यापासून आणि टाकाऊ पदार्थापासून खत तयार होते आणि त्यामुळे कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होते, जमीन भुसभुशीत राहते, जमिनीची पीएच पातळी मध्ये समतोल टिकून ठेवते, जमिनीची पोत सुधारते, जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन कमी प्रमाणात होते, गांडूळ खतामुळे जमिनीची धूप कमी होते.
हि गांडूळ खताची फायदे आहेत.
2. गांडूळ खताची माहिती
गांडूळ हा प्राणी जमिनीत राहणारा प्राणी आहे. गांडूळ हा प्राणी जमिनीतील पदार्थ खातो आणि विष्ठा बाहेर सोडून देतो. या त्याच्या विष्ठे पासून आपणास शेतीमध्ये फायदेशीर असलेले गांडूळ खत मिळते. या खताचे शेतीची प्रत वाढण्याच्या दृष्टीने खूप महत्व आहे.
3. सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे ? Important of Organic Farming ?
सुपीकता, मातीची रचना आणि जैवविविधता राखणे आणि सुधारणे आणि जमिनीची धूप कमी करणे यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे.
4. सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? Advantages & Disadvantages Organic Farming ?
फायदे-
1) सेंद्रिय शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते.
2) आरोग्यास पोषक असण्याऱ्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाची निर्मिती होण्यास मदत होते.
तोटे-
1) सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. या नैसर्गिक स्त्रोतांची मर्यादित उपलब्धता असते. त्यामुळे यांना विकत घेण्यासाठी जास्त खर्च लागू शकतो.
2) सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादन कमी होते.
5. सेंद्रिय शेती म्हणजे काय? What is an Organic Farming / Agriculture?
सेंद्रिय शेती, ज्याला पर्यावरणीय शेती किंवा जैविक शेती म्हणूनही ओळखले जाते, ही एक कृषी प्रणाली आहे जी शेती सेंद्रिय उत्पत्तीची म्हणजे खतांचा वापर करते, जसे की कंपोस्ट खत, जैविक खत.
आजच्या या Vermicompost – Gandul Khat Nirmiti In Marathi ( गांडूळ खत कसे तयार करावे ? ) लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics