मित्रांनो या लेखांमध्ये आपण सेंद्रिय खतांपैकी हिरवळीचे खत ( Green Manure ) या विषयाचे पूर्ण माहिती घेणार आहोत. ‘हिरवळीचे खत’ ( Green Manure ) म्हणजे शेतामध्ये वाढवलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला, कोवळ्या फांद्या पानांसह बाहेरून आणून किंवा जमिनीमध्ये त्यांची पेरणी करून वाढवलेली पिके जेव्हा फुलोऱ्यावर येतात तेव्हा त्यांना नांगरून जमिनीमध्ये गाडून एक जीव करून या वनस्पतींच्या हिरव्या आणि कोवळ्या अवशेषांपासून तयार केले गेलेले खत होय.
तुम्ही गांडूळ खत ( Vermicompost ) या विषयीची माहिती गांडूळ खत ( Vermicompost ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
हिरवळीची खते सेंद्रिय पदार्थ तसेच पिकांच्या अन्नद्रव्यांचा जमिनीतील साठा वाढावा यासाठी हिरवे पिक जमिनीत गाडण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. अशा प्रक्रियेतून तयार झालेल्या खतांना ‘हिरवळीचे खत’ किंवा ‘बिवड’ म्हणतात. पावसाळ्यातील पहिल्या पावसात हिरवळीच्या खताचे बी पेरले जाते, व तयार झालेले पिक जमिनीत गाडले जाते. बरयाचदा करंज, भेंड, अंजन व ग्लीरीसिदिया या वनस्पतीची पानेही जमिनीत गाडली जातात.
हिरव्या खतासाठी शिंबावंत वनस्पती व इतर वनस्पती किंवा दोन प्रकारच्या वनस्पती वापरतात. भारतात याकरिता सामान्यत: सनताग, रानशेवरी (धैंचा), उडीद, मुगवेल, गवार, तूर, कुळीथ (हुलगा), नीळ, मसूर, वाटाणा, शेंजी, बरसीम, मेथी, लाख, ग्लिरिसिडिया इ. वनस्पती वापरतात. काही वेळा पाण्याचा निचरा कमी होण्यासाठी व जमिनीची धूप कमी करण्यासाठी लावलेल्या पिकांचा वापर हिरव्या खतांसाठी करतात. जमिनीत गाडण्याच्या वेळी पीक रसदार असावे व जमिनीत भरपूर ओल असावी म्हणजे ते चांगले कुजते. गाडल्यापासून ४–६ आठवड्यांनंतर दुसरे पीक लावतात. अशा रीतीने दर हेक्टरी १२–१५ टन हिरवे खत जमिनीत गाडले जाते.
हिरवळीच्या खताचे फायदे (Benefits of Green Manure):
- हिरवळीचे खत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बाचे प्रमाण वाढवते.
- जमिनीमधील पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
- जमिनीमध्ये फायदेशीर असणारे सूक्ष्मजीवाणूंच्या निर्मितीसाठी फायदेशीर ठरते.
- हिरवळीच्या खतामुळे सुमारे प्रती हेक्टरी 50- 175 किलो नत्राचे प्रमाण असते.
- यामुळे मातीमधील भौतिक, रासायनिक व जैविक पोतावर किंवा वातावरणामध्ये कोणत्याही प्रकारे प्रदूषण होत नाही.
- हिरवळीच्या खतांच्या आच्छादनामुळे जमिनीची धूप कमी होते आणि मातीमध्ये ओलावा टिकून राहतो.
- सामान्यता शेंगावर्गीय पिकांपासून बनवलेले एक टन हिरवळीचे खत हे 2.8 ते 3 टन शेणखताच्या बरोबरीचे असते. म्हणजेच शेणखता पेक्षाही याचा जास्त फायदा आपण मिळू शकतो.
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके / वनस्पती व त्यातील नत्राचे प्रमाण ( Crops / Plants used for Making Green Manure & their Nitrogen Content ):
अ. क्र. ( Sr. No. ) | पिकांचे नाव ( Name of Crops ) | नत्राचे शेकडा प्रमाण ( Percentage of Sodium ) |
1 | ताग (भोरू) | 0.46 |
2 | चवळी | 0.42 |
3 | गवार | 0.49 |
4 | सुर्यफुल | 0.45 |
5 | हरभरा | 0.50 |
6 | सोयाबीन | 0.71 |
7 | उडीद | 0.47 |
8 | मटकी | 0.35 |
9 | लसून घास | 0.73 |
10 | करंज | 2.61 |
11 | अंजन | 1.42 |
12 | ऐन | 2.04 |
13 | भेंड | 2.90 |
14 | गिरिपुष्प | 2.74 |
हिरवळीचे खत तयार करताना घ्यावयाची काळजी ( Precautions to be taken while Preparing Green Manure ):
- हिरवळीचे खत बनवण्यासाठी आपण जे पीक लावतो ते जलद वाढणारे असावे.
- तसेच पिकाची निवड करताना ते पीक रसरशीत व तंतूचे असावे त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
- हे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये वाढणाऱ्या असावे. त्याचबरोबर शेंगावर्गीय गटातील असावे.
- तसेच हे पीक निवडताना त्याचा जमिनीवर कोणत्याही प्रकारे वाईट परिणाम होऊ नये याची खात्री करावी.
- जेव्हा खतासाठी लावलेले पीक हे फुलोऱ्यावर येते त्याच्या अगदी अगोदरच हे पीक नांगराच्या साह्याने जमिनीमध्ये काढावे.
- त्याचबरोबर हे पीक लवकर कुजण्यासाठी आणि जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी उत्तम जलसिंचनाची सुविधा असावी.
हिरवळीचे खत आणि पिके यांचे महत्त्व ( Importance of Green Manure & Crops ):
शाश्वत शेती ही पीक रोटेशन आणि मातीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर यासारख्या पद्धतींवर अवलंबून असते. हिरवळीच्या खतांच्या पिकांचा वापर करून जमिनीच्या ऱ्हासाचा धोका दूर केला जाऊ शकतो, जे जमिनीचे संरक्षण करतात, सुपिकता देतात आणि त्यातील सेंद्रिय सामग्री वाढवतात. रासायनिक खतांची मागणी कमी झाल्यामुळे आणि सघन माती मशागतीमुळे सुधारित निरोगी माती अधिक दीर्घकालीन अन्नसुरक्षा देखील दर्शवते. पीक लागवडीच्या संपूर्ण प्रक्रियेत कमी कृत्रिम खते आणि कमी जड उपकरणे वापरण्याची क्षमता हवा आणि पाण्यात सोडल्या जाणार्या प्रदूषकांच्या पातळीत मोठी घट दर्शवते. हिरवळीच्या खताच्या पिकांच्या लागवडीमुळे उत्पादक सेंद्रिय शेती तयार करू शकतात.
हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती ( Methods of Making Green Manure ):
- नुकत्याच फूलो-यात आलेले हिरवळीच्या पिकांची जमिनीलगत कापणी करावी . कापलेले हिरवळीचे पीक शेतात लोखंडी नागंराने तास घेउन नागंराच्या प्रत्येक सरीमध्ये उपलब्ध प्रमाणात टाकावे .नंतर नागंराच्या दुस-या तासाच्या वेळी अन्यथा धानाच्या चिखलणीच्या वेळी संपूर्ण गाडले जाईल याची काळजी घ्यावी .हिरवळीचे पीक जमिनीत गाडून झाल्यावर वरुन फळी किंवा मैद फिरवावा .त्यामुळे जमिनीत गाडलेले सेंद्रिय पदार्थ पूर्णपणॆ झाकले अथवा दाबले जाऊन ते कुजण्याची क्रिया वेगाने सुरु हाते.
- हिरवळीचे पीक कुजण्यास जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असावा लागतो म्हणून सर्वसाधारणपणे हिरवळीच्या पिकांची पेरणी जून अथवा पावसाच्या सुरवातीस करुन आँगस्टमध्ये गाडणी करावी . हिरवळीचे पीक गाडण्याच्या वेळी जर पाऊस पडला नाही किंवा जमिनीलगत ओलावा कमी असेल तर पाणी द्यावे .त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया जलद होईल.
- निरनिराळ्या हंगामातील पिकांचे हिरवळीचे खत करण्याच्या वेळी हिरवळीचे पीक फुलो-यावर आलेले असावे .ही पिके ६ ते ८ आठवड्यात फुलो-यावर येतात .ही पिके ज्या शेतात घेतली असतील त्याचे खत तयार करावे .या हिरवळीच्या पिकांची पाने बाहेरून आणतात ती जमिनीवर पसरवून नांगरामागे टाकून गाडावीत .ट्रायकोडरमा चा उपयोग केल्यास ह्या खताची प्रत वाढविता येईल.
- कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल.
- शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल.
हिरवळीच्या खतांचे प्रकार ( Types of Green Manure ):
हिरवळीच्या खतांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. त्यामध्ये शेंगा आणि बिगर शेंगा असे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. शेंगा ही अशी झाडे आहेत ज्यांची मुळे जमिनीतील जीवाणूंसोबत काम करतात आणि वातावरणातील नायट्रोजन अडकतात. बिगर शेंगा ही मुख्यत्वे कव्हर पिके आहेत जी मातीची धूप रोखतात.
1) शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते ( Green Manures to be Cultivated in the Field ):
जेव्हा हिरवळीच्या खतांचे पीक शेतात सलग ,मिश्न किंवा एखाद्या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून पेरतात व त्याच शेतात ते पीक फुलो-यावर येण्यापूर्वी शेतात नागंरून मिसळतात ,तेव्हा त्याला शेतातच घेण्यात येणारे हिरवळीचे खत असे म्हणतात .
या प्रकारच्या हिरवळीच्या खतामध्ये ताग,गवार ,चवळी ,धैचा ,मूग ,मटकी ,मेथी ,लाख ,मसूर ,वाटाणा ,उडीद ,कुळीथ,सेंजी,शेवरी ,लसुरघास ,बरसीम या पिकांचा समावेश असतो.
2) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत ( Green Leaves Green Manure ):
पडीक जमिनीवर अथवा जंगलात वाढणा-या वनस्पतीची कोवळी हिरवी पाने आणि फांद्या गोळा करून शेतात गाडणे अथवा पडीक जमिनीवर किंवा शेताच्या बांधावर हिरवळीच्या झाडांची लगवड करून त्याचा पाला आणि कोवळ्या फांद्या शेतात पसरवून नांगरणीच्या अथवा चिखलणीच्या वेळी मातीत मिसळणे होय .
हिरवळीच्या खतासाठी गिरिपुष्प , शेवरी ,करंज ,सुबाभुळ ,टाकळा,कर्णिया,ऎन ,किंजळ यांची झाडे व झुडपे पडीक जमिनीत वाढ्वून त्यांच्या हिरव्या पानाण्चा व कोवळ्या फांद्याचा हिरवळीच्या खतासाठी वापर करतात .
हिरवळीचे खत हे खाली दिलेल्या काही विविध गटांमध्ये वर्गीकरण केले जाते ( Green Manure are classified into a few different groups as listed below ).
- सुकलेली पिके हे तणांच्या वाढीसाठी मदतगार ठरतात आणि पोषण गमावणार नाही याची काळजी घेतात. यासाठी उदा. हिवाळ्यातील राई आणि बकव्हीट.
- जमीन झाकून टाकणारी पिके म्हणजेच जी पिके माती जागतात आणि जमिनीची धूप रोखण्यासाठी मदत करतात. उदाहरणार्थ – मसूर, ओट्स, क्लोवर, इत्यादी.
- ब्रेक क्रॉप्स ही अशी पिके आहेत जी कीटक, रोग आणि कीटकांच्या जीवनचक्रात बाधा आणतात. उदाहरणार्थ – मोहरी, ब्रासिका, राई, इत्यादी.
- पिकांना आवश्यक असणारे पोषकतत्वे यांचे संरक्षण करणारी पिके. यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन वाया जाण्यापासून वाचवणे आणि माती जास्तीत जास्त सुपीक होईल याची खात्री करावी. यामध्ये रायगरास, तेल मुळा या पिकांचा समावेश होतो.
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी आवश्यक असणारी पिके ( Crops required for Making Green Manure ):
1) ताग / बोरु ( Jute ):
ताग हे हिरवळिचे उत्तम खत आहे .ज्या विभागात पुरेसा पाऊस अथवा सिंचनाच्या पाण्याची हमी असते तेथे तागाचे पीक घेण्यात यावे .सर्व प्रकारच्या जमिनीत या खताची वाढ चांगली होत असली तरी आम्लधर्मिय जमिनीत या पीकांची वाढ जोमाने होत नाही .तसेच पाणी साचून राहणा-या शेतात तागाची चांगली वाढ होत नाही .पावसाळ्याच्या सुरूवातीस तागाचे बी हेक्टरी ५० ते ६० किलो पेरावे .पेरणीनंतर ५ ते ६ आठवड्यांनी हे पीक फुलो-यावर येण्याच्या सुमारास ६० ते ७० से .मी .उंच वाढली असतांना नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडून टाकावे .तागामध्ये नत्राचे प्रमाण ०.४६ टक्के असून या पिकापासून हेक्टरी ८० ते ९० किलो नत्र मिळते.
2) धैचा ( Dhaicha ):
तागापेक्षा काटक असे हिरवळीचे हे पीक असून कमी पर्जन्यमान, पाणथळ, क्षारमय अथवा आम्लधर्मीय जमिनीत सुध्द हे पिक तग धरु शकते .या वनस्पतीच्या मुळांवर तसेच खोडावरही गाठी दिसून येतात या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू सहजीवी नत्र स्थिरीकरणाच्या प्रक्रियेने हवेतील नत्राचे स्थिरीकरण करतात. या पिकांच्या लगवडीसाठी हेक्टरी २५ ते ४० किलो बियोणे पावसाळ्याच्या सुरूवातीस शेतात पेरावे . बियाण्याची उगवण लवकर होण्यासाठी त्यास गंधकाची प्रक्रिय करून परत थंड पाण्याने धुवावे आणि त्यानंतर रायझॊबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिय बियाण्यास करावी .पिकाच्या वाढीसाठी आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करून पीक ६ ते ७ आठवड्यात ९० ते १०० से .मी .उंचीपर्यत वाढले असता जमिनीत नांगराने गाडून टाकावे .या काळात धैच्यापासून १० ते २० टनापर्यत हिरव्या सेंद्रिय पदार्थाची निर्मिती होते .या वनस्पतीत नत्राचे शेकडा प्रमाण ०.४६ ट्क्के इतके आहे .भाताची लावणी करण्यापूर्वी आठ दिवस पीक जमिनीत गाडल्यास हेक्टरी ८० किलो नत्राची उपलब्धता होऊ शकते.
3) सेंजी ( Senji ):
रब्बी हंगामासाठी हे उपयुक्त हिरवळीचे खत आहे . सिचनाची सोय असलेल्या ठिकाणी हेक्टरी ३० ते ४० किलो बियाण्याचा वापर करून पेरणी करावी .जानेवारीच्या अखेरीस जमिनीत गाडण्यास ते योग्य होते.उसाच्या पिकास ते योग्य हिरवळीचे खत आहे.
4) घेवडा ( Beans ):
हे पीक कमी पर्जन्यमान व हलक्या प्रतीच्या जमिनीत चांगले वाढते .पाणथळ जमीनीस हे पीक योग्य नाही .पावसाळ्याच्या सुरूवातील प्रती हेक्टरी ५० किलो बियोण पेरावे .नतर आँगस्टच्या दुस-या आठवड्यात ते जमिनीत गाडावे.
5) गिरीपुष्प ( Gliricidia ):
झुडुप वर्गातील हे हिरवळीचे खत कोणत्याही प्रकारच्या जमिनीत तसेच निरनिराळ्या पर्जन्यामानाच्या प्रदेशात चांगले येते .या झाडाची लगवड दोन प्रकारे करतात .पहिल्या पध्दतीत छाट कलमाद्वारे लागवड करण्यासाठी ३० से .मी . लांब ३ सेमी .व्यासाची दोन छाट कलमे निवडून पावसाळ्याच्या सुरुवातीस ३० x३० x ३० सेमी .आकाराचा खड्डा करून बाधावर अथवा पडीक जमिनीत लगवड करावी .
दुस-या पध्दतीत गादी वाफे तयार करून अथवा प्लँस्टिकच्या पिशवीत बी पेरून रोपे तयार करावे .ही रोपे ५ आठवड्यांची झाल्यावर पावसाच्या सुरूवातीस शेताच्या बांधावर खड्डे खोदून लावावीत .पहिल्या वर्षी उन्हाळ्यात रोपांना पाणी देणे आवश्यक असून दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक छाटणीला २५ ते ३० किलो हिरवा चारा मिळू शकतो .या झाडाच्या फांद्याची वरचे वर छाटणी करूनही या झाडांना नवीन फूट येते आणि त्यांच्या हिरव्या पालवीपासून हिरवळीचे उत्तम खत मिळते .
गिरीपुष्पाची पाने धैचा, मेंड व वनझाडाचा पालापाचोला यापेक्षा जलद कुजतात .गिरीपुष्पाच्या पानांम्ध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते .सेंद्रिय कर्ब ३६ टक्के ,नत्र २. ७० टक्के ,स्फूरद ०. ५ टक्के व पालाश १ .१५ टक्के आहे म्हणून नत्रयुक्त खतांच्या खर्चात बचत करण्यासाठी गिरीपुष्प हिरवळीच्या खतांचा मोठा सहभाग आहे.
6) द्विदल कडधान्याची पिके ( Dicot Pulse Crops ):
पावसाळ्याच्या सुरुवातीस शेत तयार करून मूग ,चवळी ,उडीद ,कुळी्थ ,गवार ,यांचे बियाणे शेतात पेरले असता या द्विदल वर्गीय पिकांचा हिरवळीच्या खतासाी चांगला उपयोग होतो जमिनीची पुर्व मशागत केल्यावर मूग ,उडीद ,कुळीथ यासाठी २५ ते ३० कि .ग्रँ . प्रति हेक्टरी बियाणे पेरावे पेरणीपुर्वी बियाण्यास राय़झॊबियम जीवाणु चोळूण आवश्यकतेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात .पीक फुलो-यावर येण्यापुर्वी नांगरणी करून जमिनीत गाडले असता यापासून प्रति हेक्टरी ५० ते ६० कि .ग्रँ .नत्र पिकास उपल्ब्ध होतो.
हिरवळीच्या खताचे फायदे आणि तोटे ( Advantages and Disadvantages of Green Manure ):
सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणारे बरेच लोक हिरवळीच्या खतासारख्या नैसर्गिक खतांचा वापर करतात. ही झाडे सरासरी गोळा करत असलेला नायट्रोजन मानक वापर दराने खनिज नायट्रोजन खत पूर्णपणे बदलू शकतो. तथापि, या धोरणावर तोडगा काढण्यापूर्वी अनेक फायदे आणि तोटे विचारात घेणे आवश्यक आहे. जमीन बिनशेती न ठेवता हिरवळीच्या खताची पिके घेण्याचे प्राथमिक फायदे खालील यादीत दिले आहेत.
हिरवळीच्या खताचे फायदे ( Advantages of Green Manure ):
1) तण निर्मूलन करणे ( Eradication of Weeds ):
हिरवी खते एक प्रकारचे नैसर्गिक तण नियंत्रण म्हणून काम करतात कारण ते तणांच्या वाढीस प्रतिबंध करतात आणि त्यांना जाड बायोमासमध्ये प्रवेश करणे कठीण बनवते.
2) कीड आणि रोग शमन करणे ( Pest & Disease Mitigation ):
नगदी पीक धोक्यात आणणार्या प्रमुख कीटकांची लोकसंख्या काही पिकांच्या कीटकांपासून दूर ठेवण्याच्या आणि रोगांचा प्रसार रोखण्याच्या क्षमतेमुळे कमी होऊ शकते. काही वनस्पती प्रजाती त्यांच्या स्वतःच्या मुळांच्या आत कीटकांनाही अडकवू शकतात.
3) फायदेशीर जीवांचे समर्थन करणे ( Supporting Beneficial Organisms ):
फुलांच्या वनस्पती परागकण करणाऱ्या कीटकांमध्ये आकर्षित होतात, ज्यामुळे परिसंस्थेसाठी उपयुक्त असलेल्या प्रजातींची संख्या वाढते. उदाहरणार्थ, मधमाश्या आणि भौंमा फॅसेलिया वनस्पतींच्या फुलांकडे आकर्षित होतात. अतिरिक्त बोनस म्हणून, खत जमिनीतील जीवाणू आणि इतर प्राण्यांना खायला घालते. मातीचे एकत्रिकरण, जे जमिनीची सच्छिद्रता आणि सेंद्रिय पदार्थ वाढवतात, बहुतेक या जीवांच्या क्रियाकलापांचे उत्पादन आहेत. मातीतील जिवाणू वनस्पतीच्या मुळांपासून त्यांचे पोषण मिळवतात. दफन केलेल्या वनस्पती जमिनीत अधिक सूक्ष्मजीव जीवन वाढवण्यास मदत करतात कारण ते कुजतात.
हिरवळीच्या खताचे तोटे ( Disadvantages of Green Manure ):
हिरवे खत वापरण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, स्पष्ट फायदे असूनही काही तोटे विचारात घेणे आवश्यक आहे.
1) वेळ लागणे ( Take Time ):
मुख्य पीक पेरण्यापूर्वी, प्रथम आच्छादित पिकांची छाटणी करणे आणि त्यांना फिरवणे आवश्यक आहे. हे एक वेळ घेणारे ऑपरेशन आहे. जर कापणी ऍलेलोपॅथिक आहे, जे याचा अर्थ असा आहे की ते मातीत काही हानिकारक संयुगे सोडतात, पुढील पीक उगवण्यास एक महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.
2) जास्त ओलावा लागणे ( Excess Moisture ):
इतर प्रत्येक वनस्पतीप्रमाणेच, हिरवे खत पिकांना टिकून राहण्यासाठी ओलावा आवश्यक असतो. म्हणून, जर त्यांची लागवड कमी प्रमाणात आर्द्रता असलेल्या प्रदेशात करायची असेल, तर ते उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब घेऊ शकतात. यामुळे नगदी पिकाचा विकास टिकवून ठेवण्यासाठी अधिक सिंचनाचा वापर करणे आवश्यक आहे.
3) परिभ्रमण मर्यादा ( Rotation Limit ):
तुमच्या शेतीच्या कामांमध्ये खताचा समावेश केल्याने नवीन पीक जोडण्यासाठी तुमचे पीक रोटेशन वेळापत्रक समायोजित करणे आवश्यक आहे. जर मुख्य रोपाची कापणी झाल्यानंतर लगेचच हिरवळीच्या खताची पिके लावली गेली, तर ते जमिनीला सावरण्यासाठी आणि पुढील वाढीच्या हंगामासाठी तयार होण्यासाठी पुरेसा वेळ देत नाहीत.
निष्कर्ष / Conclusion
‘हिरवळीचे खत’ ( Green Manure ) म्हणजे शेतामध्ये वाढवलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला, कोवळ्या फांद्या पानांसह बाहेरून आणून किंवा जमिनीमध्ये त्यांची पेरणी करून वाढवलेली पिके जेव्हा फुलोऱ्यावर येतात तेव्हा त्यांना नांगरून जमिनीमध्ये गाडून एक जीव करून या वनस्पतींच्या हिरव्या आणि कोवळ्या अवशेषांपासून तयार केले गेलेले खत होय.
FAQs
1. हिरवळीचे खत म्हणजे काय ? ( What is the Green Manure ? )
‘हिरवळीचे खत’ ( Green Manure ) म्हणजे शेतामध्ये वाढवलेल्या हिरव्या वनस्पती, झाडांचा पाला, कोवळ्या फांद्या पानांसह बाहेरून आणून किंवा जमिनीमध्ये त्यांची पेरणी करून वाढवलेली पिके जेव्हा फुलोऱ्यावर येतात तेव्हा त्यांना नांगरून जमिनीमध्ये गाडून एक जीव करून या वनस्पतींच्या हिरव्या आणि कोवळ्या अवशेषांपासून तयार केले गेलेले खत होय.
2. हिरवळीच्या खताचे फायदे कोणते ? ( What are the Benefits of Green Manure ? )
1. हिरवळीचे खत जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बाचे प्रमाण वाढवते.
2. जमिनीमधील पाणी व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमता वाढवते.
3. जमिनीमध्ये फायदेशीर असणारे सूक्ष्मजीवाणूंच्या निर्मितीसाठी फायदेशीर ठरते.
4. हिरवळीच्या खतामुळे सुमारे प्रती हेक्टरी 50- 175 किलो नत्राचे प्रमाण असते.
3. हिरवळीचे खत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी पिके कोणती ? ( What are the Crops used to Make Green Manure? )
हिरवळीचे खत तयार करण्यासाठी ताग (भोरू), चवळी, गवार, सुर्यफुल, हरभरा, सोयाबीन, उडीद, मटकी, लसून घास, करंज, अंजन, ऐन, भेंड, गिरिपुष्प ही पिके वापरतात.
4. हिरवळीचे खत तयार करताना कोणती काळजी घ्यावी ? ( What Care should be taken while Preparing Green Manure? )
1. हिरवळीचे खत बनवण्यासाठी आपण जे पीक लावतो ते जलद वाढणारे असावे.
2. तसेच पिकाची निवड करताना ते पीक रसरशीत व तंतूचे असावे त्यामुळे कुजण्याची प्रक्रिया लवकर होते.
3. हे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये वाढणाऱ्या असावे. त्याचबरोबर शेंगावर्गीय गटातील असावे.
4. तसेच हे पीक निवडताना त्याचा जमिनीवर कोणत्याही प्रकारे वाईट परिणाम होऊ नये याची खात्री करावी.
5. हिरवळीचे खत आणि पिके यांचे महत्त्व सांगा ? ( Explain the Importance of Green Manure & Crops ? )
शाश्वत शेती ही पीक रोटेशन आणि मातीची सुपीकता टिकवण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर यासारख्या पद्धतींवर अवलंबून असते. हिरवळीच्या खतांच्या पिकांचा वापर करून जमिनीच्या ऱ्हासाचा धोका दूर केला जाऊ शकतो, जे जमिनीचे संरक्षण करतात, सुपिकता देतात आणि त्यातील सेंद्रिय सामग्री वाढवतात.
6. हिरवळीचे खत तयार करण्याच्या पध्दती कोणत्या ? ( What are the Methods of Preparing Green Manure? )
1. कपाशीच्या रांगामध्ये तूणधान्य ,शेगवर्गीय व तेलवर्गीय पीक घेऊन ह्या पिकांच्या कापणी नंतर कपाशीच्या रांगामध्ये जमिनीत पुरावे ,उत्तम हिरवळ खत म्हणून कपाशीवर ह्याचा परिणाम दिसून येतॊ . सोयाबिन ,तूर व ज्वारी सोबत पेरून ,सोयाबीन हिरवळखत म्हणून वापरता येईल ;ज्वारी व तूर ह्यांचे उत्पादनात वाढ होईल.
2. शेतात उपलब्ध काडी कचरा व गवत ह्यांचे ढिग शेतात जागोजागी करुन कुजण्यास ठेवावे व योग्यवेळी जमिनीत गाडावे कुजण्याची प्रक्रिया लवकर होण्यास ३ .५ फुट x ३.५ फुट खड्डयात गवत व काडी कचरा कुजवता येईल.
7. हिरवळीच्या खतांचे प्रकार कोणते ? ( What are the Types of Green Manure? )
हिरवळीच्या खतांचे 1) शेतात लागवड करून घेण्यात येणारी हिरवळीची खते, 2) हिरव्या कोवळ्या पानांचे हिरवळीचे खत असे प्रकार आहेत.
8. हिरवळीच्या खताचे उद्दिष्टय / फायदे कोणते ? ( What are the Advantages of Green Manure? )
1) तण निर्मूलन करणे.
2) कीड आणि रोग शमन करणे.
3) फायदेशीर जीवांचे समर्थन करणे.
9. हिरवळीच्या खताचे तोटे कोणते ? ( What are the Disadvantages of Green Manure? )
1) वेळ लागणे.
2) जास्त ओलावा लागणे.
3) परिभ्रमण मर्यादा.
आजच्या या हिरवळीचे खत ( Green Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics