फार पूर्वीच्या काळापासून गाईला आपण माता असे मानतो. आयुर्वेदामध्येही गाईचे महत्व तसेच तिच्यापासून मिळणारे शेण, गोमूत्र याचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. गायींची लघवी म्हणजे ‘गोमूत्र’ ( Cow Urine ) होय. गोमूत्र मध्ये पिकांची वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्यासाठी परिणामकारक अन्नद्रव्य असतात. गोमूत्र एकाच वेळी तीन प्रकारे पिकांसाठी फायदे कारक ठरते. ते म्हणजे खत, हार्मोन आणि कीड व रोगनाशक अशाप्रकारे लाभदायक ठरते. गोमूत्रा मध्ये पिकांसाठी असलेल्या आवश्यक घटकांचा विचार केला तर त्यामध्ये 70 ते 80 टक्के पाणी असले तरी फास्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, कार्बलीक आमल, लॅक्टोज तसेच इतर महत्वाचे घटक असतात व ही सगळी घटक झाडांच्या वाढीसाठी पूरक आहेत.
तुम्ही ‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) या विषयीची माहिती शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

गोमूत्र म्हणजेच मनुष्याला मिळालेले एक प्रकारचे अमृतच आहे. त्यापासून मानवाचे कॅन्सर सारखे बलाढ्य रोग ही बरे होऊ शकतात. कारण त्यामध्ये अत्यंत आवश्यक असे खनिजे आहेत. मग ते पिकांसाठी असो किंवा मानवासाठी एकंदर संपूर्ण सजीवांना त्याचा फायदा होतो.गोमुत्रामध्ये पिकाची वाढ व उत्पन्नावर निश्चित चांगले परिणाम करणारी द्रव्य आहेत. गोमूत्र एकाच वेळेस पिकाला खत, हार्मोन, कीड आणि रोगनाशक अशा तीन प्रकारे मदत करते. गोमूत्रात ७०-८० टक्केपाणी असले तरी फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, काबरेलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोस आणि महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात.
गोमूत्राचा वापर करताना घ्यावयाची काळजी ( Precautions to be taken while using Cow Urine ):

- शेतामध्ये पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या 10 ते 15 टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ उदा.हिंग आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे. तसेच कडूनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कन्हेर, निलगिरी, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने व फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्र टाकावे. कडुनिंबाचा 5% पाण्यातील थंडर क आणि इतर वनस्पतींच्या गरम अर्क ( पाच ते दहा टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते. बाजारात गोमुत्रा वर आधारित व्यापारी कीडनाशके ही उपलब्ध आहेत.
- या मिश्रणाची फवारणी केल्यास दोघा मधील रासायनिक घटक एकत्र येतात. यामुळे किडी व रोगांचे प्रमाण कमी होते. झाडांना थोड्या प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षण विरुद्ध क्षमता वाढते आणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
- हिंगाचा वापर केल्यामुळे त्याच्या वासाने किडीची मादी अंडी कमी प्रमाणात टाकते. उडणाऱ्या किडी वासामुळे दूर जातात. किडीची वाढ खुंटते, त्यांच्या जीवनाअवस्था वर त्याचा अडथळा येतो, त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. इत्यादी कायदेशीर बाबी गोमूत्र व वनस्पतीजन्य पदार्थांचा मिश्रणामुळे शक्य होतात आणि पिकाचे नुकसान कमी होते की टळते.
गोमुत्राची आंघोळ ( Cow Urine Bath ):

शेतातील पिकांवर किंवा इतर वनस्पतींवर किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असतो. त्यामुळे अशा रोगांपासून रोखण्यासाठी गोमूत्राचा अत्यंत उपयोग होतो. गोमुत्राचे वरील प्रमाणे तयार केलेले द्रावण हे झाडांसाठी खूपच फायदेशीर ठरते. हे द्रावण तयार करताना 900 मिली पाण्यामध्ये 100 मिली गोमूत्र मिसळावे. अशाप्रकारे एक गोमूत्राचे द्रावण झाडावर किंवा वनस्पतीवर आठवड्यातून एकदा फवारल्याने किडींसारख्या रोगांवर. नियंत्रण येण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. त्याचबरोबर गोमुत्रामधील पोषक द्रव्यांमुळे झाडांची किंवा वनस्पतींची पाने हिरवी होतात आणि तजेलदार दिसू लागतात. त्यामुळे चांगल्या प्रकारे त्यांची वाढ होते. गोमुत्राचे आंघोळ म्हणजेच एखाद्या झाडावर किंवा वनस्पतीवर तिच्या पानांवरून खाली ओघळ येईपर्यंत फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे लाभ मिळतात. गोमुत्राची आंघोळ हे सेंद्रिय शेतीचे उत्तम उदाहरण आहे.
निष्कर्ष / Conclusion
गायींची लघवी म्हणजे ‘गोमूत्र’ ( Cow Urine ) होय. गोमूत्र मध्ये पिकांची वाढ होण्यासाठी व चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळण्यासाठी परिणामकारक अन्नद्रव्य असतात. गोमूत्र एकाच वेळी तीन प्रकारे पिकांसाठी फायदे कारक ठरते. ते म्हणजे खत, हार्मोन आणि कीड व रोगनाशक अशाप्रकारे लाभदायक ठरते.
FAQs
1. गोमूत्र म्हणजे काय ? ( What is Cow Urine ? )
फार पूर्वीच्या काळापासून गाईला आपण माता असे मानतो. आयुर्वेदामध्येही गाईचे महत्व तसेच तिच्यापासून मिळणारे शेण, गोमूत्र याचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे. गायींची लघवी म्हणजे ‘गोमूत्र’ ( Cow Urine ) होय.
2. गोमूत्रामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घटकांचा समावेश आहे ? ( What Important Elements are Included in Cow Urine ? )
गोमूत्रामध्ये फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, कार्बोनेट आणि पोटॅश, अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, कार्बलीक आमल, लॅक्टोज या महत्वाच्या घटकांचा समावेश आहे.
3. गोमूत्राचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ? ( What Precautions should be taken while using Cow Urine ? )
1. शेतामध्ये पिकांवर फवारण्यासाठी गोमूत्राच्या 10 ते 15 टक्के पाण्यातील द्रावणात इतर पदार्थ उदा.हिंग आणि थोडे साबणाचे पाणी मिसळावे. तसेच कडूनिंब, जंगली एरंडी, निरगुडी, शेवंती, कन्हेर, निलगिरी, कांदा, मिरची इत्यादी वनस्पतींची पाने व फळे बारीक कापून किंवा वाटून गोमूत्र टाकावे. कडुनिंबाचा 5% पाण्यातील थंडर क आणि इतर वनस्पतींच्या गरम अर्क ( पाच ते दहा टक्के) गोमूत्रात मिसळल्यास फवारणी जास्त परिणामकारक ठरते. बाजारात गोमुत्रा वर आधारित व्यापारी कीडनाशके ही उपलब्ध आहेत.
2. या मिश्रणाची फवारणी केल्यास दोघा मधील रासायनिक घटक एकत्र येतात. यामुळे किडी व रोगांचे प्रमाण कमी होते. झाडांना थोड्या प्रमाणात अन्नद्रव्येही मिळाल्यामुळे झाडाची अवर्षण विरुद्ध क्षमता वाढतेआणि खताची मात्रा लांबणीवर टाकता येते.
4. गोमुत्राची आंघोळ म्हणजे काय ? ( What is Cow Urine Bath? )
गोमुत्राचे आंघोळ ( Cow Urine Bath ) म्हणजेच एखाद्या झाडावर किंवा वनस्पतीवर तिच्या पानांवरून खाली ओघळ येईपर्यंत फवारणी केल्यास चांगल्या प्रकारे लाभ मिळतात.
आजच्या या गोमूत्र ( Cow Urine ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करा.
Related Topics
- हिरवळीचे खत ( Green Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers
- निर्वाह शेती ( Subsistence Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming
- सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?
- कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers