‘विस्तृत शेती’ ( Extensive Farming ) म्हणजे मोठ्या प्रमाणावर केली जाणारे शेती होय. यामध्ये प्रामुख्याने समशितोषण कटिबंधीय हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये ही शेती केली जाते. यामध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात भांडवलाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून विस्तृत शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने एकच पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आणि या शेतीमधून निघणारे उत्पन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. यालाच आपण एक्सपोर्ट करणे असे म्हणतो. अशा प्रकारच्या शेतीला ‘विस्तृत शेती’ ( Extensive Farming ) असे म्हणतात.
तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming ) यांतील फरक सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming या लेखात जाणून घेऊ शकता.

विस्तृत शेतीचे गुणधर्म ( Features of Extensive Farming ):

ही शेती प्रामुख्याने गवताळ प्रदेशांमध्ये केली जाते. उदाहरणार्थ उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरेशिया यांसारख्या प्रदेशांमध्ये विस्तृत शेती केली जाते. या प्रदेशांमध्ये विविध प्रकारचे गवते आढळतात. ज्यामध्ये प्रेअरी, पंपाज, वेल्ड, डाऊन्स, कॅटनबरी, स्टेप्स यांसारख्या गवतांचे प्रकार आढळतात. वरील सर्व प्रदेश हे गवताळ असून गवतापासून तयार झालेली चरणोंझम नावाची सुपीक मृदा या ठिकाणी आढळते. म्हणून या ठिकाणी विस्तृत शेती ( Extensive Farming ) केली जाते.
विस्तृत शेती कोठे आढळते ? Where is Extensive Agriculture Found ?
या शेतीचा सर्वात मोठा पट्टा युरोप व आशिया मध्ये पसरलेला आहे. रशियातील किवपासून सायबेरियातील ओमास्क पर्यंतचा विस्तीर्ण असा सुपीक प्रदेश आहे. याचा पूर्व- पश्चिम विस्तार हा 3200 किलोमीटर असून पश्चिमेस 1100 किलोमीटर रुंदी आहे आणि पूर्वेस याचा विस्तार कमी होत जातो. युक्रेनला ‘गव्हाचे कोठार’ असे म्हणतात.
विस्तृत शेतीसाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती ( Geographical Conditions Necessary for Extensive Agriculture ):

समाजशीतोष्ण कटिबंधातील खंडांतर्गत भागात असलेल्या या गवताळ प्रदेशात पूर्वी भटके पशुपालन केले जात होते. युरोपियन लोकांच्या आगमनानंतर अमेरिकेत व्यापारी धान्य शेतीची सुरुवात झाली. या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात सुपीक चरणोजाम मृदा आहे. शेतीच्या दृष्टीने सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण या प्रकारच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते. सागरी प्रदेशापासून दूर असलेल्या प्रदेशात 30 ते 65 सेंटीमीटर पाऊस पडतो. गव्हाच्या शेतीसाठी हा पाऊस पुरेसा आहे. गहू हे या शेतातील प्रतिनिधिक पीक आहे. याचबरोबर मका, बार्ली यांसारखे कडधान्य पिके ही घेतली जातात. या देशातील अधिक अंश लोकसंख्या ही द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायात गुंतलेली आहेत. फक्त पाच ते सात टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसाय करते. त्यामुळे कमीत कमी मनुष्यबळाचा उपयोग करून आणि जास्तीत जास्त भांडवल वापरून ही शेती केली जाते.
शेतीचा विस्तृत आकार ( Extensive Farm Size ):
या प्रकारच्या शेतीमध्ये शेताचा आकार हा विस्तृत असतो. जगातील इतर शेती प्रकारातील शेतजमिनींपेक्षा येथील शेताचा आकार सर्वात जास्त असतो. सर्वसाधारणपणे 200 ते 400 हेक्टर पर्यंत तर काही ठिकाणी 1600 हेक्टर पर्यंत एवढे शेतीचे क्षेत्र असते. अमेरिकेतील कॅनडा, संयुक्त संस्थाने, अर्जेंटिना तसेच ऑस्ट्रेलिया येथे विरळ लोकवस्ती असल्यामुळे जमिनीचा आकार मोठा आहे. आणि येथे जमीन स्वस्त दरात उपलब्धही होते.
विस्तृत शेतीतील मुख्य पीक ( A Major Crop in Extensive Agriculture ):

गहू हे विस्तृत शेतीतील मुख्य पीक आहे. एक पीक पद्धती किंवा पिकाचे विशेषीकरण हा या शेतीमधील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. व्यापारी धान्य शेतीत पिकापासून पैसे मिळवणे हे उद्दिष्ट असल्याने शेतीत विशेषीकरण झालेले आढळते. उत्पादनासाठी एकच गहू हे पीक निवडले जाते. गहू व मका याशिवाय बार्ली, राय, सोयाबीन यांसारखी पिके ही घेतली जातात.
विस्तृत शेतीतील यांत्रिकीकरण ( Mechanization in Extensive Agriculture ):

विरळ व मध्यम लोकवस्ती असल्यामुळे कमी श्रम आणि लोकांचा कमी पुरवठा असल्याने विस्तृत शेतीमध्ये शेतमजूर भेटणे कठीण होते. तसेच त्यांचा खर्चही परवडत नाही. या शेतीमध्ये बहुतांश कामे ही नांगरणे, पेरणे, कापणे, मळणे, धान्य भरणे इत्यादी कामे ही मोठमोठ्या यंत्रांच्या साह्याने केली जातात. या शेतीमध्ये ट्रॅक्टरचा वापर सर्वत्र केला जातो. औषध फवारणीसाठी मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर वापरले जातात. त्याचबरोबर हेलिकॉप्टरचाही वापर काही ठिकाणी केला जातो. तसेच आधुनिक जलसिंचनाच्या पद्धतींचा या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. या सर्व गोष्टींमुळे विस्तृत शेतीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते.
विस्तृत शेतीतील दर हेक्टरी अल्प व दरडोई कमाल उत्पन्न ( Low per Hectare and Maximum per Capita Income in Extensive Agriculture ):
विस्तृत शेती प्रकारात दर हेक्टरी जे उत्पन्न मिळते हे कमी असते. परंतु विरळ वस्तीमुळे दरडोई उत्पन्न हे जास्त राहते. संयुक्त संस्थानांमध्ये गव्हाचे दर हेक्टरी उत्पादन 2150 किलोग्रॅम, रशियामध्ये 1700 किलोग्रॅम, तर कॅनडामध्ये 1600 किलोग्रॅम इतक्या प्रमाणावर आहे.
उत्तम बी-बियाणे व खतांचा वापर ( Use of Good Seeds and Fertilizers ):
विस्तृत शेतीमध्ये उत्तम प्रकारच्या बी-बियाणांचा वापर केला जातो. त्याच बरोबर सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचा ही सर्वत्र वापर केला जातो. आधुनिक यांत्रिक अवजारांच्या साह्याने उत्पादन निश्चितपणे वाढते.
विस्तृत शेतीतील वाहतूक व व्यापार ( Transportation & Trade in Extensive Agriculture ):
रस्ते व लोहमार्गाच्या सुविधा असल्यामुळे गव्हासारखे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पिकांची वाहतूक ही सहजपणे शक्य होते. युरोप व अमेरिकेतील नागरी केंद्रे गव्हाच्या बाजारपेठा आहेत. या शेती प्रकारातील गहू हे सरकार मोठ्या प्रमाणावर खरेदी करते आणि वापरासाठी आवश्यक तो गहू ठेवून राहिलेला अतिरिक्त गहू हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी पाठवला जातो.
निष्कर्ष / Conclusion
‘विस्तृत शेती’ ( Management of Subsistence Farming ) म्हणजे मोठ्या प्रमाणावर केली जाणारे शेती होय. यामध्ये प्रामुख्याने समशितोषण कटिबंधीय हवामान असलेल्या प्रदेशांमध्ये ही शेती केली जाते. यामध्ये कमीत कमी मनुष्यबळाचा वापर केला जातो. त्याच बरोबर मोठ्या प्रमाणात भांडवलाचा आणि यंत्रसामग्रीचा वापर करून विस्तृत शेती केली जाते.
यामध्ये प्रामुख्याने एकच पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आणि या शेतीमधून निघणारे उत्पन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. यालाच आपण एक्सपोर्ट करणे असे म्हणतो. अशा प्रकारच्या शेतीला ‘विस्तृत शेती’ ( Management of Subsistence Farming ) असे म्हणतात.
FAQs
1. विस्तृत शेती म्हणजे काय ? What is Extensive Agriculture / Farming ?
‘विस्तृत शेती’ ( Management of Subsistence Farming ) म्हणजे मोठ्या प्रमाणावर केली जाणारे शेती होय.
यामध्ये प्रामुख्याने एकच पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आणि या शेतीमधून निघणारे उत्पन्न हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी पाठवले जाते. यालाच आपण एक्सपोर्ट करणे असे म्हणतो. अशा प्रकारच्या शेतीला ‘विस्तृत शेती’ ( Management of Subsistence Farming ) असे म्हणतात.
2. विस्तृत शेतीचे गुणधर्म कोणते ? What are the Characteristics of Extensive Agriculture?
ही शेती प्रामुख्याने गवताळ प्रदेशांमध्ये केली जाते. उदाहरणार्थ उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अर्जेंटिना, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरेशिया यांसारख्या प्रदेशांमध्ये विस्तृत शेती केली जाते. या प्रदेशांमध्ये विविध प्रकारचे गवते आढळतात. ज्यामध्ये प्रेअरी, पंपाज, वेल्ड, डाऊन्स, कॅटनबरी, स्टेप्स यांसारख्या गवतांचे प्रकार आढळतात. वरील सर्व प्रदेश हे गवताळ असून गवतापासून तयार झालेली चरणोंझम नावाची सुपीक मृदा या ठिकाणी आढळते. म्हणून या ठिकाणी विस्तृत शेती ( Extensive Farming ) केली जाते.
3. विस्तृत शेती कोठे आढळते ? Where is Extensive Agriculture Found ?
या शेतीचा सर्वात मोठा पट्टा युरोप व आशिया मध्ये पसरलेला आहे. रशियातील किवपासून सायबेरियातील ओमास्क पर्यंतचा विस्तीर्ण असा सुपीक प्रदेश आहे. याचा पूर्व- पश्चिम विस्तार हा 3200 किलोमीटर असून पश्चिमेस 1100 किलोमीटर रुंदी आहे आणि पूर्वेस याचा विस्तार कमी होत जातो. युक्रेनला ‘गव्हाचे कोठार’ असे म्हणतात.
4. कोणत्या देशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात ? Which country is called Wheat Barn ?
युक्रेनला ‘गव्हाचे कोठार’ असे म्हणतात.
5. विस्तृत शेतीसाठी आवश्यक असणारी भौगोलिक परिस्थिती कोणती ? What are the Geographical Conditions required for Extensive Agriculture?
समाजशीतोष्ण कटिबंधातील खंडांतर्गत भागात असलेल्या या गवताळ प्रदेशात पूर्वी भटके पशुपालन केले जात होते. युरोपियन लोकांच्या आगमनानंतर अमेरिकेत व्यापारी धान्य शेतीची सुरुवात झाली. या विस्तीर्ण गवताळ प्रदेशात सुपीक चरणोजाम मृदा आहे. शेतीच्या दृष्टीने सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण या प्रकारच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.
6. विस्तृत शेतीतील शेतीचा आकार साधारणतः केवढा असतो ? What is the Average Size of a Farm in an Extensive Farm ?
या प्रकारच्या शेतीमध्ये शेताचा आकार हा विस्तृत असतो. जगातील इतर शेती प्रकारातील शेतजमिनींपेक्षा येथील शेताचा आकार सर्वात जास्त असतो. सर्वसाधारणपणे 200 ते 400 हेक्टर पर्यंत तर काही ठिकाणी 1600 हेक्टर पर्यंत एवढे शेतीचे क्षेत्र असते. अमेरिकेतील कॅनडा, संयुक्त संस्थाने, अर्जेंटिना तसेच ऑस्ट्रेलिया येथे विरळ लोकवस्ती असल्यामुळे जमिनीचा आकार मोठा आहे. आणि येथे जमीन स्वस्त दरात उपलब्धही होते.
7. विस्तृत शेतीतील मुख्य पीक कोणते ? What is the Main Crop in Extensive Agriculture ?
‘गहू’ हे विस्तृत शेतीतील मुख्य पीक आहे.
8. विस्तृत शेती मध्ये उत्तम बी-बियाणे व खतांचा वापर केल्याने काय होते ? What Happens to the Use of Better Seeds & Fertilizers in Extensive Agriculture?
विस्तृत शेतीमध्ये उत्तम प्रकारच्या बी-बियाणांचा वापर केला जातो. त्याच बरोबर सेंद्रिय खते आणि रासायनिक खतांचा ही सर्वत्र वापर केला जातो. आधुनिक यांत्रिक अवजारांच्या साह्याने उत्पादन निश्चितपणे वाढते.
9. विस्तृत शेतीसाठी वाहतूक व व्यापार महत्वाचा का आहे ? Why is Transport & Trade Important for Extensive Agriculture ?
रस्ते व लोहमार्गाच्या सुविधा असल्यामुळे गव्हासारखे मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या पिकांची वाहतूक ही सहजपणे शक्य होते. युरोप व अमेरिकेतील नागरी केंद्रे गव्हाच्या बाजारपेठा आहेत. या शेती प्रकारातील गहू हे सरकार मोठ्या प्रमाणावर खरेदी करते आणि वापरासाठी आवश्यक तो गहू ठेवून राहिलेला अतिरिक्त गहू हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी पाठवला जातो.
आजच्या या विस्तृत शेती ( Extensive Farming )- सेंद्रिय शेती व प्रकार / Types of Organic Farming लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics