सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?

हरितक्रांतीमध्ये रासायनिक खताचा अवलंब भारतात होऊ लागला. सुरुवातीच्या काळात रासायनिक शेतीमुळे शेतमालात मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू लागले मात्र नंतर जमीन कठीण होऊ लागली. आधीच्या काळात जमिनीची मशागत ही लाकडी नांगराने करत असत. ती नंतरच्या काळात लोखंडी नांगराने नांगरावी लागली कारण जमीन जास्तच कठीण होऊ लागली. त्यानंतर शेतीची मशागत ट्रक्टरने शेती केली जाऊ लागली.म्हणजेच रासायनिक औषधामुळे जमीन कठीण होऊन मृत होत चालली होती. सेंद्रीय पद्धतीने शेती हरितक्रांतीपर्यंत केली गेली. National Geographic च्या Agriculture मध्येही शेती विषयी माहिती उपलब्ध आहे.


शेतकरी जास्त उत्पन्न मिळावे, या उद्देशाने रसायनांचा खतांचा अतिवापर करीत आहेत.त्याचा वाईट परिणाम म्हणून कॅन्सरसारख्या घातक आजारांच्या प्रश्नांना देशाला सामोरे जावे लागत आहे. संशोधक शास्त्रज्ञ, डॉ. रश्मी सांघि (आय.आय.टी. कानपूर) यांनी सांगितले की, रासायनिक खते वापरून केल्या गेलेल्या शेतीतून मिळालेल्या उत्पादनाचे सेवन केल्याने आईच्या दुधामध्ये रासायनिक औषधाचे अंश मिळाले गेलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सेंद्रिय शेती वर भर देण्यात यावा.

तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming ) यांतील फरक सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming या लेखात जाणून घेऊ शकता.

Advantages & Disadvantages of Organic Farming

सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते ? Advantage & Disadvantage of Organic Farming?

Advantages of Organic Farming ( सेंद्रिय शेतीचे फायदे )

1) सेंद्रिय शेतीमध्ये मातीचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचा समतोल या गोष्टींना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे मातीची धूप कमी होते, जलप्रदूषण होत नाही तसेच शेतीला फायदेशीर असणारे कीटक आणि वन्यजीवांचे नुकसान कमी होते.

2) सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात.

3) सेंद्रिय शेतीमुळे पाण्याची गुणवत्ता चांगली राहते. त्यामुळे मानवाचे आरोग्य जोपासले जाते. शिवाय जमिनीची धूप कमी होते.
सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य व्यवस्थित राहते त्यामुळे हवामान बदल कमी करण्यासाठी मदत मिळते. सेंद्रिय मातीमध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण जास्त असते.

4) सेंद्रिय शेतीचे उद्दिष्ट उच्च गुणवत्तेचे अन्न तयार करणे हे आहे. त्यामुळे उत्पादनांना नैसर्गिक चव असते व पौष्टिक मूल्य आणि उत्पादनांची गुणवत्ता चांगली असते.


Disadvantage of Organic Farming ( सेंद्रिय शेतीचे तोटे )

1) सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन कमी झाल्यास उत्पादनांची किंमत वाढू शकतात आणि अन्नाची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सेंद्रिय शेतीसमोर एक आव्हान उभे राहू शकते.

2)
सेंद्रिय शेती नैसर्गिक स्त्रोतांवर अवलंबून असते जसे, कंपोस्ट खत. या नैसर्गिक खतांमध्ये पिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोषक तत्त्वांची कमतरता भासू शकते. त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊ शकते.

3)
सेंद्रिय शेतीमध्ये पीक रोटेशन, जैविक किड नियंत्रण आणि कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्यासाठी सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर केला जातो. या सेंद्रिय कीटकनाशकांच्या प्रभाव रासायनिक कीटकनाशकांच्या तुलनेत कमी प्रभावी असू शकतो.

4)
सेंद्रिय शेती पद्धतीला रासायनिक शेतीच्या तुलनेत अधिक शारीरिक श्रम करावे लागते. उदाहरणार्थ हाताने गवत (तण) काढणे, पीक फिरवणे आणि कीटकांची निरीक्षण करणे. यामुळे मुजरांचा खर्च वाढतो आणि उत्पादन खर्च देखील वाढतो.


निष्कर्ष / Conclusion

  1. सेंद्रिय शेतीमध्ये तयार केलेले अन्नधान्य यामध्ये रासायनिक अवशेषांचा धोका कमी होतो. त्यामुळे सेंद्रिय उत्पादने ही आरोग्यदायी व सुरक्षित मानली जातात.
  2. सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने उत्पादन कमी झाल्यास उत्पादनांची किंमत वाढू शकतात आणि अन्नाची वाढती जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी सेंद्रिय शेतीसमोर एक आव्हान उभे राहू शकते.

FAQs

1. सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? Advantages & Disadvantages Organic Farming ?

फायदे-
1) सेंद्रिय शेतीमुळे पिकांची गुणवत्ता वाढते.
2) आरोग्यास पोषक असण्याऱ्या आणि उच्च प्रतीच्या उत्पादनाची निर्मिती होण्यास मदत होते.

तोटे-
1) सेंद्रिय शेतीमध्ये नैसर्गिक घटकांचा वापर केला जातो. या नैसर्गिक स्त्रोतांची मर्यादित उपलब्धता असते. त्यामुळे यांना विकत घेण्यासाठी जास्त खर्च लागू शकतो.
2) सेंद्रिय शेती पद्धतीने उत्पादन कमी होते.

2. भारतातील शेतीचे मुख्य प्रकार कोणते आहेत ? What are the main types of Farming in India ?

भारतातील शेतीचे मुख्य 5 प्रकार आहेत.

1) मिश्र शेती ( Mixed Farming )
2) वृक्षारोपण ( Plantation )
3) निर्वाह शेती ( Subsistence Farming )
4) कोरडवाहू / ओल्या जमिनीची शेती ( Dry Land & Wet Land Farming )
5) सघन आणि विस्तृत शेती ( Intensive & Extensive farming )

3. सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे ? Important of Organic Farming ?

सुपीकता, मातीची रचना आणि जैवविविधता राखणे आणि सुधारणे आणि जमिनीची धूप कमी करणे यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे.

4. सेंद्रिय शेती म्हणजे काय? What is an Organic Farming / Agriculture?

सेंद्रिय शेती, ज्याला पर्यावरणीय शेती किंवा जैविक शेती म्हणूनही ओळखले जाते, ही एक कृषी प्रणाली आहे जी शेती सेंद्रिय उत्पत्तीची म्हणजे खतांचा वापर करते, जसे की कंपोस्ट खत, जैविक खत.

आजच्या या सेंद्रिय शेतीचे फायदे आणि तोटे ? / Advantages & Disadvantages Organic Farming ? in Marathi लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.


Related Topics

Leave a Comment