शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers

‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) म्हणजे नावाप्रमाणेच जनावरांच्या विष्ठेपासून तयार केलेले खत होय. शेणखत प्रामुख्याने गाई, म्हशी, बैल, थोड्याफार प्रमाणात शेळ्या व मेंढ्या यांची विस्टा तसेच या प्राण्यांचे मूत्र आणि उरलेला चारा यांचा एकत्रित मिश्रण असते. वरील सर्व घटकांना खड्ड्यामध्ये एकत्रित करून कुजण्यासाठी ठेवले जाते. आणि काही काळानंतर या शेणखताचा वापर शेतकरी मित्र शेतातील पिकांसाठी करतात. शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत आहे. फार पूर्वीपासून शेणखताचा वापर केला जातो.

Table of Contents

तुम्ही गोमूत्र ( Cow Urine ) या विषयीची माहिती गोमूत्र ( Cow Urine ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

शेणखत ( Cow Dung )

ज्या ठिकाणी जनावरांचा गोठा असतो त्या ठिकाणी जनावरांचे मलमूत्र ज्या मातीमध्ये शोषले जाते ती माती जर आपण उकिरड्यांमध्ये म्हणजेच शेणखत ज्या ठिकाणी टाकतो किंवा बनवतो अशा ठिकाणी वापरली तर शेणखताची प्रत सुधारण्यास मदत होते. सर्वसाधारणपणे चांगल्या प्रकारच्या शेणखतामध्ये ०.४ टक्के नत्र, ०.१५ टक्के स्फूरद आणि ०.५० टक्के पालाश असते. आपल्या देशामध्ये दमट व उष्ण प्रकारचे हवामान असल्यामुळे जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचे विघटन जलद वेगाने होते. याचा शेणखत निर्मितीसाठी खूप मोठा फायदा होतो.

शेण खताचे काही दुष्परिणाम ही आहेत. जसे की शेणखत हे काही प्रमाणात दूषित असते म्हणजेच यामध्ये तण आणि रोगजन्य घटक यांचा समावेश असतो. शेणखतामधून पिकास पालाश ,नत्र व स्फुरद मिळते. शेणखताचा वापर पोषक अन्नद्रव्य म्हणून केला जातो. जमिनीसाठी शेणखताचा वापर मोलाचा आहे.


शेण खताचे फायदे ( Benefits of Dung Manure ):

शेण खताचे फायदे ( Benefits of Dung Manure )

  1. शेणखतामुळे जमिनीमधील पाणी धरून ठेवण्याचे क्षमता वाढते.
  2. पिकांच्या पांढऱ्या मुलांचे वाढ होते ज्यामुळे पिकांना कोणत्याही हवामानामध्ये निरोगी राहण्यास मदत मिळते.
  3. शेणखतामुळे जमिनीमधील म्हणजेच मातीतील सामू मध्ये चांगले बदल करतात.
  4. त्याच बरोबर शेतातील उत्पन्न वाढण्यासही शेणखताचा मोठा हातभार होतो.
  5. शेणखतामुळे जमिनीमधील सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढते.
  6. जमिनीतून वापरण्यात येणारे जैविक-कीड-रोगनाशके जसे ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, पॅसिलोमायसिस, बिव्हेरिया, मेटारायझियम आणि जैविक खते जसे ऍझोटोबॅक्‍टरसह इतर अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची वाढ नैसर्गिक पद्धतीने होण्यास मदत होते.
  7. जमिनीतील मुळांच्या कार्यक्षेत्रातील श्‍वसन वाढून मुळांद्वारे संश्‍लेषित करण्यात येणाऱ्या संजीवकांची निर्मिती चांगल्या प्रकारे होते.

शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी ( Precautions to be taken while using Cow Dung Manure ):

शेणखत वापरताना घ्यावयाची काळजी ( Precautions to be taken while using Cow Dung Manure )

  1. प्रामुख्याने शेतकरी घराशेजारी किंवा गोठ्याशेजारी उकिरडा तयार करतात. त्यामध्ये वर्षभर साठवलेले शेण हे चांगल्या प्रकारे खुजल्यानंतर शेतासाठी उत्तम प्रकारचे अमृत म्हणून वापरले जाते. शेणखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या आळ्या आढळतात. ज्यांना आपण “शेणकिडे” म्हणून ओळखतो.
  2. भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी देतात. त्यामुळे शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये होणारा प्रसार थांबविता येईल.
  3. विविध भुंगेरावर्गीय किडींच्या अळ्या शेणखताद्वारे पसरून शेतातील मुख्य पिकास नुकसान पोचवितात. यासाठी आपण कंपोस्ट रिच औषधाचा वापर आपण आपल्या शेणखताच्या ढीगावर करावा. वर्षांतून दोन वेळा त्याचे वापर केल्यास शेणखत पूर्ण कुजण्यास मदत होते व वरील प्रकारच्या किडींची वाढ शेणांमध्ये होत नाही. कंपोस्ट रिचमुळे शेणखत कुजलेले असल्यामुळे जमिनीत हुमणीची वाढ होत नाही. खत लगेच पिकांना लागू होते.
  4. भुंगेरावर्गीय किडींची मादी मे-जून महिन्यांत शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी घालतात. त्यामुळे शेतातील शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये घातल्या जाणाऱ्या अंड्यानंतर होणारा प्रसार थांबविता येईल. शेणखत जमिनीत मिसळताना त्यात सापडणाऱ्या भुंगेऱ्यांच्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.
  5. मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरवातीला पडणाऱ्या पावसाबरोबरच हुमणीच्या मादी भुंगेऱ्यांकडून अशा कुजणाऱ्या शेणात अंडी घातली जातात. त्यामुळे अशा शेतात पुढील हंगामात घेतले जाणारे पीक हे हुमणीच्या अळीद्वारे प्रादुर्भावग्रस्त होते.जर हुमणीचा प्रादुर्भाव दिसत असेल तर धन्वंतरी कंपनीच्या नेमारीच अल्ट्रा या औषधाचा वापर आपण करावा. या औषधामुळे आपल्या जमिनीतील हुमणी दीर्घकाळपर्यंत वाढू शकत नाही.
  6. काही शेतात तर शेळ्या-मेंढ्या ज्या गोलाकार रिंगणात बसविल्या जातात, त्याच भागात पावसाळ्यात हुमणीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून येतो. कुजणाऱ्या शेणात पिकांस उपद्रवी ठरणारी बुरशी, मर रोग, मूळकूज, करपा, सड या रोग निर्माण करणाऱ्या बुरशी या शेणात नसाव्यात. जर आपल्या जमिनीत बुरशीजन्य रोगांची वाढ होताना दिसत असेल तर एकरी अर्धा लिटर सोईल गार्ड या औषधाचा वापर करावा.
  7. बऱ्याच वेळा शेतातील निंदण्यात येणारे गवत जनावरांच्या गव्हाणीत चारा म्हणून वापरले जाते. अशा तणांच्या मुळास लटकलेली शेतातील माती रोगकारक बीजाणूंसह शेणाबरोबर खड्ड्यात जाते. आणि त्याच ठिकाणी इतर सेंद्रिय पदार्थांबरोबर वाढते. अशा वेळेस शेणखतावर जैविक प्रक्रिया म्हणजेच कंपोस्टरिच औषधांचा वापर करणे आवश्यक ठरते.
  8. शेणखत शेतात मिसळताना चांगले कुजलेले असावे. शेणखत चांगले कुजविण्यासाठी कंपोस्टिंगकल्चर वापरावेत. शेणखत पूर्णपणे कुजविण्यासाठी कंपोस्ट कल्चर (कंपोस्ट रीच) चा वापर करावा. कंपोस्ट कल्चरचा वापर करताना ५ टन शेणखतासाठी १५० ग्रॅम कंपोस्टरीचं कल्चर पुरेसे ठरते.

एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण ( Amount of Nutrients Available from 1 Ton of Cow Dung ):

अ. क्र. ( Sr. No. )अन्नद्रव्यांचे नाव ( Name of Nutrients )अन्नद्रव्यांचे प्रमाण ( Amount of Nutrients )
1नत्र5.6 किलो.
2स्फुरद3.5 किलो.
3पालाश7.8 किलो.
4गंधक1 किलो.
5मंगल200 ग्रॅम.
6जस्त96 ग्रॅम.
7लोह80 ग्रॅम.
8तांबे15.6 ग्रॅम.
9बोरॉन20 ग्रॅम.
10मॉलिब्डेनम2.3 ग्रॅम.
11कोबाल्ट1 ग्रॅम.
एक टन शेणखतापासून मिळणाऱ्या अन्नद्रव्यांचे प्रमाण

शेणखताचा वापर कसा करावा ? ( How to use Cow Dung Manure ? ):

शेणखताचा वापर कसा करावा ( How to use Cow Dung Manure )

  1. सर्वसाधारणपणे बागायत क्षेत्रामध्ये 10 टन शेणखत वापरतात आणि जिरायत- कोरडवाहू क्षेत्रामध्ये प्रति हेक्टरी 5 टन शेणखत वापरतात.
  2. भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणे पेरावे.
  3. शेतामध्ये शेणखत वापरताना उघड्यावर ठेवू नये. ते लगेच शेतामध्ये पसरावे आणि कुळवाच्या साह्याने जमिनीमध्ये मिसळून द्यावे. म्हणजे त्यातील नत्रे टिकून राहतात.
  4. टोमॅटोसारख्या भाजीपाला पिकासाठी गादीवाफा तयार करण्यापूर्वीच हेक्‍टरी 20 टन शेणखत, निंबोळी पेंड, ट्रायकोडर्मा इ.सह शेतात मिसळावे. नंतर तयार झालेल्या गादीवाफ्यावर रोपांची लागवड करावी.
  5. चांगल्या कुजलेल्या शेणखताचे लहान-लहान ढीग करून त्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास यांसारखी जैविक कीडनाशके आणि जैविक खते 15 दिवसांपर्यंत मिसळून ठेवल्यास अशा जैविक घटकांची वाढ झपाट्याने होते. नंतर असे सर्व ढीग एकत्र करून भाजीपाला पिके, फळबागेत मिसळल्यास अतिशय चांगले परिणाम मिळतात. शेणखताचा उत्तम माध्यम म्हणून जैविक घटकांच्या वाढीसाठी उपयोग करून घेता येईल.
  6. जमिनीची मशागत करताना शेवटी कुळवणी आधी हेक्‍टरी पाच ते 10 टन शेणखत मिसळावे. फळबागांसाठी उपलब्धतेनुसार एकरी 10-15 टन शेणखत मिसळावे.
  7. शेणखत तयार करताना गोठ्यामध्ये किंवा उकिरड्यावर सुपर फॉस्फेटचा वापर करावा. त्यामुळे- 1) शेणखतामध्ये स्फुरदचे प्रमाण वाढते व संतुलित खत तयार होते. 2) शेणखतातील नत्रांचा अमोनियाच्या स्वरूपात होणारा नाश टळतो. 3) रासायनिक संरक्षक म्हणून वापरलेल्या सुपर फॉस्फेटमुळे आम्ल जमिनीमध्ये पिकांना स्फुरद मिळते.

शेणखताचा वापर ( Application of Dung Manure ):

अ. क्र. ( Sr. No. )पिकांचे नाव ( Name of Crops )प्रति हेक्टरी शेणखत ( Manure per Hectare )
1भुईमूग10 टन
2सोयाबीन25 ते 30 टन
3सूर्यफूल2.5 टन
4ऊस50 टन
5बाजरी10-12 टन
6खरीप ज्वारी20 टन
7गहू10-12 टन
8मका25 – 40 टन
9हळद5 टन
10चारा पिके – ( ज्वारी, बाजरी, मका, चवळी, ओट बर्शीम मका )10-15 टन
11लसुन घास20-30 टन
12आंबा, डाळिंब50 किलो प्रति झाड
13 केळी, शेवगा10 किलो प्रति झाड
14चिकू100 किलो प्रति झाड
15पेरू10 किलो प्रति झाड
16नारळ, जांभूळ, चिंचा, कागदी लिंबू10-15 किलो प्रति झाड
17मोसंबी15-20 किलो प्रति झाड
18टोमॅटो, वांगी20 टन
19कांदा, भेंडी40 टन
20कारले, वाल, काकडे20 टन
21लसूण, मिरची20-35 टन
22दोडका, टरबूज, दुधी भोपळा, खरबूज15-20 टन
23फुलकोबी, कोबी, घेवडा, बटाटा40-50 टन
24मेथी, पालक10-12 टन
25वाटाणा 25-30 टन
26मुळा50 टन
27गुलाब, कारनेशन, जरबेरा5-10 किलो प्रति झाड
28निशिगंध40-50 टन
29ग्लॅडीओलस60-100 टन
शेणखताचा वापर ( Application of Dung Manure )

निष्कर्ष / Conclusion

‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) म्हणजे नावाप्रमाणेच जनावरांच्या विष्ठेपासून तयार केलेले खत होय. शेणखत प्रामुख्याने गाई, म्हशी, बैल, थोड्याफार प्रमाणात शेळ्या व मेंढ्या यांची विस्टा तसेच या प्राण्यांचे मूत्र आणि उरलेला चारा यांचा एकत्रित मिश्रण असते.

वरील सर्व घटकांना खड्ड्यामध्ये एकत्रित करून कुजण्यासाठी ठेवले जाते. आणि काही काळानंतर या शेणखताचा वापर शेतकरी मित्र शेतातील पिकांसाठी करतात. शेणखत हे पारंपारिक सेंद्रिय खत आहे. फार पूर्वीपासून शेणखताचा वापर केला जातो.


FAQs

1. शेणखत म्हणजे काय ? ( What is Dung Manure ? )

‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) म्हणजे नावाप्रमाणेच जनावरांच्या विष्ठेपासून तयार केलेले खत होय. शेणखत प्रामुख्याने गाई, म्हशी, बैल, थोड्याफार प्रमाणात शेळ्या व मेंढ्या यांची विस्टा तसेच या प्राण्यांचे मूत्र आणि उरलेला चारा यांचा एकत्रित मिश्रण असते.

2. शेण खताचे फायदे कोणते आहेत ? ( What are the Benefits of Dung Manure ? )

1. शेणखतामुळे जमिनीमधील पाणी धरून ठेवण्याचे क्षमता वाढते.
2. पिकांच्या पांढऱ्या मुलांचे वाढ होते ज्यामुळे पिकांना कोणत्याही हवामानामध्ये निरोगी राहण्यास मदत मिळते.
3. शेणखतामुळे जमिनीमधील म्हणजेच मातीतील सामू मध्ये चांगले बदल करतात.
4. त्याच बरोबर शेतातील उत्पन्न वाढण्यासही शेणखताचा मोठा हातभार होतो.

3. शेणखत वापरताना कोणती काळजी घ्यावी ? What Care should be taken while using Cow Dung Manure ? )

1. प्रामुख्याने शेतकरी घराशेजारी किंवा गोठ्याशेजारी उकिरडा तयार करतात. त्यामध्ये वर्षभर साठवलेले शेण हे चांगल्या प्रकारे खुजल्यानंतर शेतासाठी उत्तम प्रकारचे अमृत म्हणून वापरले जाते. शेणखतामध्ये हुमणी, कॉकचाफर भुंगे, नारळावरील गेंड्या भुंग्याच्या अळ्या इत्यादी किडींच्या आळ्या आढळतात. ज्यांना आपण “शेणकिडे” म्हणून ओळखतो.
2. भुंगेरावर्गीय किडींची मादी मे किंवा जून महिन्यात शेणासारख्या कुजणाऱ्या पदार्थांमध्ये अंडी देतात. त्यामुळे शेणाचा खड्डा, ढिगारा, उकिरडा इत्यादी मे महिन्याच्या सुरवातीलाच रिकामा करून हे शेणखत शेतात मिसळून द्यावे. त्यामुळे पाऊस पडल्यानंतर त्यामध्ये होणारा प्रसार थांबविता येईल.

4. शेणखतापासून कोणकोणती अन्नद्रव्ये मिळतात ? ( Which Nutrients are Obtained from Cow Dung Manure ? )

शेणखतापासून नत्र, स्फुरद, पालाश, गंधक, मंगल, जस्त, लोह, तांबे, बोरॉन, मेलीडेनम आणि कोबाल्ट इत्यादी मिळतात.

5. शेणखताचा वापर कसा करावा ? ( How to use Cow Dung Manure ? )

1. सर्वसाधारणपणे बागायत क्षेत्रामध्ये 10 टन शेणखत वापरतात आणि जिरायत- कोरडवाहू क्षेत्रामध्ये प्रति हेक्टरी 5 टन शेणखत वापरतात.
2. भाजीपाला रोपवाटिका तयार करताना गादीवाफ्यावर चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत ट्रायकोडर्माचा वापर करून नंतरच बियाणे पेरावे.
3. शेतामध्ये शेणखत वापरताना उघड्यावर ठेवू नये. ते लगेच शेतामध्ये पसरावे आणि कुळवाच्या साह्याने जमिनीमध्ये मिसळून द्यावे. म्हणजे त्यातील नत्रे टिकून राहतात.

6. शेणखताचा वापर कोणकोणत्या पिकांसाठी केला जातो ? ( For which Crops is Cow Dung Manure Used ? )

शेणखताचा वापर भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, ऊस, बाजरी, खरीप ज्वारी, गहू, मका, हळद, चारा पिके – ( ज्वारी, बाजरी, मका, चवळी, ओट बर्शीम मका ), लसुन घास, आंबा, डाळिंब, केळी, शेवगा, चिकू, पेरू, नारळ, जांभूळ, चिंचा, कागदी लिंबू, मोसंबी, टोमॅटो, वांगी, कांदा, भेंडी, कारले, वाल, काकडे, लसूण, मिरची, दोडका, टरबूज, दुधी भोपळा, खरबूज, फुलकोबी, कोबी, घेवडा, बटाटा, मेथी, पालक, वाटाणा, मुळा, गुलाब, कारनेशन, जरबेरा, निशिगंध, ग्लॅडीओलस यांसारख्या अनेक पिकांसाठी वापरतात.

7. शेणखत तयार करताना गोठ्यामध्ये किंवा उकिरड्यावर सुपर फॉस्फेटचा वापर का करावा ? ( Why should Super Phosphate be used in Manger or on the Sedge while preparing Cow Dung Manure ? )

सुपर फॉस्फेटचा वापर केल्याने
1) शेणखतामध्ये स्फुरदचे प्रमाण वाढते व संतुलित खत तयार होते.
2) शेणखतातील नत्रांचा अमोनियाच्या स्वरूपात होणारा नाश टळतो.
3) रासायनिक संरक्षक म्हणून वापरलेल्या सुपर फॉस्फेटमुळे आम्ल जमिनीमध्ये पिकांना स्फुरद मिळते.

आजच्या या शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.


Related Topics

Leave a Comment