प्राणी व वनस्पती अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय शेती ( Organic Farming ) म्हणजे नैसर्गिक पद्धतीने व पर्यावरणाला सुसंगत अशा घटकांचा वापर करून केलेली शेती होय. या शेती पद्धतीमध्ये निसर्गाशी सुसंगतपणे काम केले जाते.
तुम्ही सेंद्रिय शेती ( Organic Farming ) आणि रासायनिक शेती ( Chemical Farming ) यांतील फरक सेंद्रिय शेती विरुद्ध रासायनिक शेती / Organic Farming Vs Chemical Farming या लेखात जाणून घेऊ शकता.

सेंद्रिय खताचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत / Types of Organic Fertilizers
वनस्पती व प्राणी अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, तेलबियांची पेंड, हिरवळीची खते, माश्यांचे खत, हाडांचे खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींपासून सेंद्रिय खत तयार होते.
तुम्ही सेंद्रिय शेतीचे फायदे-तोटे कोणते / Advantage & Disadvantage of Organic Farming या लेखात अधिक माहिती जाणून घेऊ शकता.
गांडूळ खत

गांडूळ खतात गांडुळाची अंडीपुंज, गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ आणि अनेक जमिनीला उपयुक्त जीवाणूंचा समावेश करून तयार करण्यात आलेल्या खताला गांडूळ खत ( Vermicompost ) म्हणतात.
तुम्ही गांडूळ खत ( Vermicompost ) या विषयीची अधिक माहिती गांडूळ खत ( Vermicompost ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
शेणखत

शेणखतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश असते. गोठ्यातील पालापाचोळा, गाई-म्हशींचे शेण, मूत्र, इत्यादी घटकांपासून तयार होणाऱ्या खताला शेणखत म्हणतात. शेणाचा उपयोग बायोगॅसमध्ये ऊर्जा निर्माण कारण्यासाठी केला जातो. त्यामधून उर्वरित शिल्लक राहिलेले शेण पिकांच्या वाढीसाठी पोषक घटक म्हणून वापरले जाऊ शकते.
तुम्ही ‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) या विषयीची अधिक माहिती शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
हिरवळीची खते

या खतांपासून जमिनीचा पोत सुधारतो जमिनीला नत्र मिळते व जमीन सुपीक बनते. हिरवळीची खते तयार करण्यासाठी लवकर वाढणाऱ्या पिकांची निवड करून, त्यांची दाट पेरणी करून ते नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडतात. अशा प्रकारे तयार केल्या जाणाऱ्या खतांना हिरवळीचे खत ( Green Manure ) म्हणतात. मुगाचा पालापाचोळा जमिनीत गाडून तयार झालेल्या हिरवळीच्या खतामुळे गव्हाच्या उत्पादनात भरगोस वाढण्यास मदत होते. त्या गाडलेल्या पिकांना कुजून खत होण्यासाठी साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालवधी लागतो. शेवरी, गवार, मूग, चवळी, ताग, बरसीम, ग्लीिरिसिडीया तागापासून नत्राचा पुरवठा ५ ते ६ आठवड्यात होतो.
तुम्ही हिरवळीचे खत ( Green Manure ) या विषयीची अधिक माहिती हिरवळीचे खत ( Green Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
माशाचे खत

समुद्रकिनारी वाया गेलेल्या आणि खराब माशांपासून तसेच माशाचे तेल काढल्यानंतर उरलेल्या माश्यांचे अनावश्यक अवशेषापासून जे खत तयार होते त्या खतांना माशाचे खत ( Fish Manure ) म्हणतात. या खतामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश या जमिनीला अत्यावश्यक घटकांचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे जमिनीला सुपीक होण्यास आणि जमिनीचा पोत सुधारून भरगोस उप्त्पादन घेण्यासाठी मदत होते.
तुम्ही माशाचे खत ( Fish Manure ) या विषयीची अधिक माहिती माशांचे खत ( Fish Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
कंपोस्ट खत

कंपोस्ट खतांमध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश असते. कंपोस्ट खत हे पिकांचे कापणीनंतर उरलेले अवशेष, शेतातील गवत, कापसाची धसकट, भुसा, उसाचे पाचट, कापसाची धसकटे इ. सेंद्रिय पदार्थांचे सूक्ष्मजीवजंतूंमुळे विघटन होऊन कुजलेला पदार्थ तयार होतो त्याला कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) म्हणतात.
तुम्ही कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) या विषयीची अधिक माहिती कंपोस्ट खत ( Compost Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
खाटीकखान्याचे खत

या प्रकारच्या खतांमध्ये नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रमाणत असते. खाटीकखान्यात जनावरांच्या अवशेषापासून जे खत तयार केले जाते, त्या खताला ‘खाटीकखान्याचे खत ( Khatik Khana Fertilizer )‘ म्हणतात.
तुम्ही खाटीकखान्याचे खत ( Khatik Khana Fertilizer ) या विषयीची अधिक माहिती खाटीकखान्याचे खत ( Khatik-Khana Fertilizer ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
गोमूत्र

गोमूत्र चा उपयोग केल्याने कीड नियंत्रण होते व पिकांची वाढ चांगल्या रीतीने होण्यास मदत होते. रोग निर्माण करणारे जीवाणूपण वाढीस लागू शकतात. अश्या वेळी ट्रायकोडरमा नावाचे जिवाणू जमिनीत सोडल्यास ते रोग निर्माण करणाऱ्या जिवाणूंचा नाश करतात.
तुम्ही गोमूत्र ( Cow Urine ) या विषयीची माहिती गोमूत्र ( Cow Urine ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.
निष्कर्ष / Conclusion
वनस्पती व प्राणी अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. शेणखत, तेलबियांची पेंड, हिरवळीची खते, माश्यांचे खत, हाडांचे खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींपासून सेंद्रिय खत तयार होते.
FAQs
1. सेंद्रिय शेती का महत्त्वाची आहे ? Important of Organic Farming ?
सुपीकता, मातीची रचना आणि जैवविविधता राखणे आणि सुधारणे आणि जमिनीची धूप कमी करणे यासाठी सेंद्रिय शेती महत्त्वाची आहे.
2. सेंद्रिय शेती म्हणजे काय? What is an Organic Farming / Agriculture?
सेंद्रिय शेती, ज्याला पर्यावरणीय शेती किंवा जैविक शेती म्हणूनही ओळखले जाते, ही एक कृषी प्रणाली आहे जी शेती सेंद्रिय उत्पत्तीची म्हणजे खतांचा वापर करते, जसे की कंपोस्ट खत, जैविक खत.
3. भारतातील शेतीचे मुख्य प्रकार कोणते आहेत ? What are the Types of Farming in India ?
भारतातील शेतीचे मुख्य 5 प्रकार आहेत.
1) मिश्र शेती ( Mixed Farming )
2) वृक्षारोपण ( Plantation )
3) निर्वाह शेती ( Subsistence Farming )
4) कोरडवाहू / ओल्या जमिनीची शेती ( Dry Land & Wet Land Farming )
5) सघन आणि विस्तृत शेती ( Intensive & Extensive farming )
4. सेंद्रिय खते व प्रकार कोणते ? What are the Types of Organic Fertilizers ?
वनस्पती व प्राणी अश्या प्रकारच्या नैसर्गिक घटकांपासून जे खत तयार होते त्याला सेंद्रिय खत म्हणतात. सेंद्रिय खतांमध्ये महत्त्वाची खते म्हणजे शेणखत, तेलबियांची पेंड, हिरवळीची खते, माश्यांचे खत, हाडांचे खत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादींपासून सेंद्रिय खत तयार होते.
आजच्या या सेंद्रिय खत व प्रकार / Types of Organic Fertilizers in Marathi लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.
Related Topics