मिश्र शेती ( Mixed Farming ) – शेती व प्रकार / Agriculture & Types of Farming

मिश्र शेती ( Mixed Farming ) यामध्ये नावाप्रमाणेच एकापेक्षा जास्त पिकांची एकत्रितपणे शेती केली जाते. वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांमध्ये लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतामध्ये लावण्याच्या पद्धतीला ‘मिश्र शेती ( Mixed Farming )’ असे म्हणतात. या पद्धतीच्या शेतीमध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचे पिके आणि कडधान्यांचे पिके घेतली जातात. त्याचबरोबर इतर काही पिकांचाही या पद्धतीमध्ये समावेश केला जातो.

Table of Contents

प्रामुख्याने या शेती पद्धतीमध्ये एकावेळी दोन पिके लावतात परंतु काही वेळा तीन, चार किंवा त्याहीपेक्षा जास्त पिके घेतली जातात. मिश्र शेती ( Mixed Farming ) ही प्राचीन काळापासून चालत आलेली शेती पद्धत आहे. यामध्ये जिरायत, बागायत त्याचबरोबर कायमस्वरूपामध्ये घेतली जाणाऱ्या पिकांमध्ये मिश्र शेतीचा अवलंब केला जातो.

तुम्ही ‘शेणखत’ ( Cow Dung Manure ) या विषयीची माहिती शेणखत ( Cow Dung Manure ) – सेंद्रिय खते व प्रकार / Types of Organic Fertilizers या लेखात जाणून घेऊ शकता.

मिश्र शेती ( Mixed Farming )


मिश्र शेतीची प्रमुख उद्दिष्टे व फायदे ( Major Objectives of Mixed Farming and Benefits ):

मिश्र शेतीची प्रमुख उद्दिष्टे व फायदे ( Major Objectives of Mixed Farming and Benefits )

  1. उपलब्ध शेतीच्या क्षेत्रातील जागा, खते, पाणी, शेतमजूर यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो.
  2. दुष्काळ / अवर्षण आणि रोग व किडीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान टाळले जाते.
  3. जमिनीची सुपीकता वाढवली जाते.
  4. शेतकऱ्यांच्या रोजच्या / दैनंदिन गरजेचे पिके एकाच शेतामध्ये घेतली जातात.
  5. शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च दुय्यम पिके विकून मिळवला जातो.

मिश्र शेती पद्धती मधील दोष ( Disadvantages of Mixed Farming System ):

आपण वरील भागामध्ये मिश्र शेतीची फायदे जाणून घेतले. त्याचप्रमाणे आता आपण मिश्र शेती पद्धती मधील तोटे / दोष जाणून घेणार आहोत.

मिश्र शेती पद्धती मधील दोष ( Disadvantages of Mixed Farming System )

  1. या शेती पद्धतीमध्ये यांत्रिक अवजारांचा वापर करणे शक्य होत नाही.
  2. वेगवेगळी पिके वेगळ्या वेळी कापणीसाठी येतात ज्यामुळे मजुरांचा खर्च वाढला जातो.
  3. कोरडवाहू शेतीत पिकाच्या कापणीनंतर जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन लागलीच जमीन नांगरणे आवश्यक असते परंतु मिश्र पीक पद्धतीत सर्व पिके एकाच वेळी कापणीसाठी येत नसल्याने हे शक्य होत नाही.
  4. उशिरा तयार होणाऱ्या पिकांच्या कापणीपर्यंत अगोदरच्या पिकाच्या कापणीमुळे रिकामी झालेली जमीन वाळून तडकते आणि नांगरणीचे काम कष्टाचे होते.
  5. या पद्धतीतील पिकांची निवड काळजीपूर्वक न केल्यास रोग – किडी यांच्या प्रमाणात वाढ होण्याचा संभव असतो. ज्यांचे शेतीचे क्षेत्र कमी किंवा मर्यादित आहे त्या शेतकरी मित्रांसाठी मिश्र शेती ही नक्कीच फायद्याचे आहे.

मिश्र शेतीचे स्वरूप व प्रकार ( Nature & Types of Mixed Farming ):

मिश्र शेती ( Mixed Farming ) मध्ये एक प्रमुख पीक असते आणि एक किंवा जास्त वेगळ्या पद्धतीचे पीक घेतले जाते. यामध्ये मुख्य पीक आणि घेतले जाणारे दुसरे पीक यांचे प्रमाण ठराविक नसते. काही वेळा दुसरे पीक हे मुख्य पिकापेक्षा जास्त, जास्त तुरळक किंवा जास्त प्रमाणातही असते.

मिश्र शेतीचे स्वरूप व प्रकार ( Nature & Types of Mixed Farming )

प्रामुख्याने दुय्यम पिकांमध्ये तूर, उडीद, मूग, मटकी, हरभरा, कुथीळ हे कडधान्य पिके घेतली जातात. तसेच भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, करडई, किंवा एरंड यांसारख्या तेलबियानांचाही समावेश असतो. कापूस, अंबाडी, तुती यासारख्या धाग्यांच्या पिकांचाही समावेश केला जातो. तसेच पालेभाज्या, फळभाज्या यांचाही समावेश केला जातो. मिश्र शेतीमध्ये मुख्य पिकाच्या मध्ये ह्या दुय्यम पिकांची पेरणी केली जाते.

मिश्र शेती ( Mixed Farming ) पद्धतीला ‘आंतरपीक पद्धत ( Intercropping Method )’ असेही म्हणतात.
प्रामुख्याने आपण सर्वांनी फळबागांतील मिश्र शेती नक्कीच पाहिली असेल. ज्यामध्ये नारळ, सुपारी, फणस, आंबा, पेरू, डाळिंब व संत्री यांची झाडे एकाच बागेमध्ये लावलेली आढळून येतात.


दुय्यम पिकाची निवड कशी करावी ? ( How to choose a Secondary Crop ? ):

दुय्यम पिकाची निवड कशी करावी ( How to choose a Secondary Crop )

मिश्र शेतीमध्ये दुय्यम पिकाची ( Secondary Crop ) निवड करताना काही गोष्टींचा विचार करावा लागतो.

  1. दुय्यम पीक हे पिकांच्या वाढीला अडथळा होऊ नये.
  2. दुय्यम पीक हे कडधान्यांच्या वर्गातील असावे.
  3. मुख्य पिकाच्या अगोदर किंवा नंतर काढण्यासाठी / कापणीसाठी यावे.
  4. त्याचबरोबर पिकांच्या वाढीचे प्रमाणही लक्षात घ्यावे. म्हणजेच कोणते पीक जास्त प्रमाणात वाढते आणि कोणते पीक कमी प्रमाणात वाढते.

महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार ( Major Types of Mixed Cropping System in Maharashtra ):

महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार ( Major Types of Mixed Cropping System in Maharashtra )

1) विदर्भ, मराठवाडा व खानदेश ( जिरायत / Arable Land ):

ज्वारी व उडीद, बाजरी आणि मटकी अथवा मूग व कापूस (१०–१५ ओळी) व तूर (१ ते २ ओळी) व अधून-मधून अंबाडी व तीळ, कापूस (८ ओळी) व ज्वारी (२ ओळी).

2) दख्खन भाग ( जिरायत / Arable Land ):

बाजरी (५–६ ओळी) व तूर (१ ओळ) व अधून-मधून अंबाडी खरीप ज्वारी (३–४ ओळी) व तूर (१ ओळ), रबी जोंधळा (८ ओळी), करडई (४ ओळी) व हरभरा, गहू व हरभरा ३:१ प्रमाणात व अधून-मधून मोहरी.


3) बागायती पिके ( Horticultural Crops ):

भेंडी व जोंधळा (एकाआड एक ओळ) वाफ्यात कोबी व फुलवर (दोन्ही एकाच ओळीत अथवा एकाआड एक ओळीत) व पाण्याच्या पाटाच्या कडेने कोबी, नवलकोल, मुळा, बीट व सालीट आले वाफ्यात ओळीत आणि गोराडू दर ३·५ मी. अंतरावर ओळीत उसाच्या मुख्य पिकात बरंब्याच्या बाजूला भेंडी, जोंधळा, टोमॅटो, काकडी, मिरची, कांदा व भात हळदीच्या मुख्य पिकात मका, भेंडी, ज्वारी व मिरची.


निष्कर्ष / Conclusion

वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांमध्ये लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतामध्ये लावण्याच्या पद्धतीला ‘मिश्र शेती’ ( Mixed Farming ) असे म्हणतात. या पद्धतीच्या शेतीमध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचे पिके आणि कडधान्यांचे पिके घेतली जातात.


FAQs

1. मिश्र शेती म्हणजे काय ? What is Mixed Farming ?

वेगवेगळी पिके वेगवेगळ्या शेतांमध्ये लावण्याऐवजी एकापेक्षा जास्त पिके एकाच शेतामध्ये लावण्याच्या पद्धतीला ‘मिश्र शेती’ ( Mixed Farming ) असे म्हणतात. या पद्धतीच्या शेतीमध्ये प्रामुख्याने तृणधान्यांचे पिके आणि कडधान्यांचे पिके घेतली जातात.

2. मिश्र शेतीची प्रमुख उद्दिष्टे व फायदे कोणते ? What are the Main Objectives & Benefits of Mixed Farming?

1. उपलब्ध शेतीच्या क्षेत्रातील जागा, खते, पाणी, शेतमजूर यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला जातो.
2. दुष्काळ / अवर्षण आणि रोग व किडीसारख्या प्रतिकूल परिस्थितीत पिकांचे होणारे नुकसान टाळले जाते.

3. मिश्र शेती पद्धती मधील दोष कोणते ? What are the Disadvantages of Mixed Farming System ?

1. वेगवेगळी पिके वेगळ्या वेळी कापणीसाठी येतात ज्यामुळे मजुरांचा खर्च वाढला जातो.
2. कोरडवाहू शेतीत पिकाच्या कापणीनंतर जमिनीतील ओलीचा फायदा घेऊन लागलीच जमीन नांगरणे आवश्यक असते परंतु मिश्र पीक पद्धतीत सर्व पिके एकाच वेळी कापणीसाठी येत नसल्याने हे शक्य होत नाही.

4. मिश्र शेतीचे स्वरूप व प्रकार कसे असते ? What is the Nature and Type of Mixed Farming ?

मिश्र शेती ( Mixed Farming ) मध्ये एक प्रमुख पीक असते आणि एक किंवा जास्त वेगळ्या पद्धतीचे पीक घेतले जाते. यामध्ये मुख्य पीक आणि घेतले जाणारे दुसरे पीक यांचे प्रमाण ठराविक नसते. काही वेळा दुसरे पीक हे मुख्य पिकापेक्षा जास्त, जास्त तुरळक किंवा जास्त प्रमाणातही असते.

5. दुय्यम पिकाची निवड कशी करावी ? How to choose a Secondary Crop ?

1. दुय्यम पीक हे पिकांच्या वाढीला अडथळा होऊ नये.
2. दुय्यम पीक हे कडधान्यांच्या वर्गातील असावे.

6. महाराष्ट्रातील मिश्र पीक पद्धतीचे प्रमुख प्रकार कोणते ? What are the major Types of Mixed Cropping System in Maharashtra ?

विदर्भ, मराठवाडा व खानदेश ( जिरायत / Arable Land ), दख्खन भाग ( जिरायत / Arable Land ), बागायती पिके ( Horticultural Crops ) हे मिश्र शेतीचे प्रमुख प्रकार आहेत.

आजच्या या मिश्र शेती ( Mixed Farming) – सेंद्रिय शेती व प्रकार / Types of Organic Farming लेखातील माहिती आपणास कशी वाटली नक्की सांगा. अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी Green Sheti ला अवश्य भेट द्या आणि कोपऱ्यातील बेल आयकॉनवर क्लिक करून Subscribe करा.


Related Topics

Leave a Comment